वळणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्यानं पाठीमागून धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
By विलास जळकोटकर | Updated: May 25, 2023 16:11 IST2023-05-25T16:11:33+5:302023-05-25T16:11:40+5:30
नांदणी चेकपोस्टजवळ रात्री अपघात, बेशुध्दावस्थेत भाऊ मनु यांनी उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच ते मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

वळणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्यानं पाठीमागून धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू
सोलापूर : चेकपोस्ट येथन वळण घेणाऱ्या कंटेनरचा अंदाज न आल्यानं रात्रीच्यावेळी पाठिमागून कंटेनरला धडक दिल्यानं दुचाकीस्वार बेशुद्ध झाला. त्याला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात नेले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील नांदणी चेकपोस्टजवळ बुधवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास हा अपघात झाला.
हावटु गंगण्णा वड्यार (वय २४, रा.सातलगाव, ता. इंडी जि. विजापूर) असे मयत तरुणाचे नाव आहे. यातील दुचाकीस्वार हावटू हे बुधवारी कामानिमित्त सोलापूर येथे दुचाकीवरून आले होते. काम आटोपून रात्री ते परत सातलगावकडे निघाले होते. नांदणी चेकपोस्ट येथे ते रात्री पावणेअकराच्या सुमारास पोहचले. तेथे वळणाऱ्या कंटेनरचा हावटू यांना अंदाज आला नाही. यामुळे त्यांची दुचाकी कंटेनर (एनएल ०१/एजी/५४१३) ला पाठीमागून धडकली. यात खाली पडल्याने जखमी होऊन बेशुध्द झाले. बेशुध्दावस्थेत भाऊ मनु यांनी उपचारास शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच ते मृत पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.