सोलापूरमध्ये जीप रस्त्यावरच पलटल्यानं तरुणाचं कपाळ रक्ताळलं
By विलास जळकोटकर | Updated: April 3, 2023 17:53 IST2023-04-03T17:52:35+5:302023-04-03T17:53:09+5:30
अपघात सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला.

सोलापूरमध्ये जीप रस्त्यावरच पलटल्यानं तरुणाचं कपाळ रक्ताळलं
सोलापूर : सोलापुरातून गावाकडे निघालेली जीप आहेरवाडी गावाजवळ रोडवरच पलटी झाल्यानं जीपमधील तरुण जखमी होऊन त्याचं कपाळ रक्तबंबाळ झालं. त्याच्या छातीला आणि पायाला दुखापत झाली. हा अपघात सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. बिरप्पा धोंडप्पा पांढरे (वय- २८, रा. होनमुर्गी, ता. दक्षिण सोलापूर) असे जखमीचे नाव आहे.
यातील जखमी हा पहाटे पाचच्या सुमारास सोलापुरातून जीपमधून होनमुर्गी या त्याच्या गावाकडे निघाला होता. पहाटे साडेपाचच्या सुमारास जीप आहेरवाडी गावापासून काही अंतरावर आलेली असताना अचानक रस्त्याची स्थिती न पाहता वाहन चालवल्याने जीप पलटी झाली. यामध्ये बिरप्पा हा तरुण रस्त्यावर पडला, यात त्याच्या कपाळाला जखमी होऊन रक्तबंबाळ झाला. छातीला, पायालाही जखम झाली. तातडीने सकाळी ६ च्या सुमारास जखमीचा मित्र खाजामिन काझी याने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून, त्याच्यावर उपचार सुरु आहेत. सिव्हील पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे.