शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोत..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 12:28 IST

मुख्यमंत्र्याचे अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकºयांना आश्वासन

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगवी खुर्द व सांगवी बुद्रुक या पुलाची पाहणी केली. या वेळी शेतकºयांशी त्यांनी संवाद साधला. मी दिलासा देण्यासाठी आलोय. काळजी घ्या, आम्ही तुमच्या सोबत आहोते, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी शेतकºयांची निवेदने स्वीकारली. तसेच ११ शेतकºयांना मदतीचा धनादेश सुपूर्द केले. 

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, पंढरपूर, बार्शी, करमाळा, माढा, सांगोला, मंगळवेढा व उत्तर सोलापूर या तालुक्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान झाले आहे. तर एकाच या भागाला त्याचा मोठा फटका बसला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या दौºयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सोलापूर दौºयावर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सोलापूरहून थेट अक्कलकोटला पोचले. सांगवी खुर्द येथील बोरी नदीवरील पुलाची पाहणी करण्यासाठी आले. मात्र शेतकºयांची मागणी होती की मुख्यमंत्र्यांनी बांधावर येऊन पाहणी करावी. यावेळी नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या. 

तत्पूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोलापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांच्या स्वागताला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गणेश वानकर, जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे आणि माजी आमदार दिलीप माने हे उपस्थित होते. कोरोनामुळे उर्वरित पदाधिकाºयांना विमानतळाबाहेर थांबवण्यात आले होते. 

मुख्यमंत्र्यांसोबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, विनायक राऊत आदी उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेfloodपूरRainपाऊसakkalkot-acअक्कलकोट