शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

सांगोल्यात बेकायदेशीर गर्भपात, दोघां डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल, सोनोग्राफी सीलसह न्यु धनश्री हॉस्पीटल केले सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 2:42 PM

न्यू धनश्री हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात  खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच हॉस्पिटलवर केलेल्या कारवाईत सोनोग्राफी मशीन सील असताना पुन्हा न्यु धनश्री या नावाने वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा उद्योग डॉ. जाधवर दाम्पत्यांनी सुरू केला होता.

ठळक मुद्देसांगोला शहरांतर्गत  कडलास नाक्यावरील न्यू धनश्री हॉस्पिटलवर विधी समुपदेशक अ‍ॅड. रामेश्वरी माने, कक्ष सेवक हनिफ शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप बेलपत्रे, नायब तहसीलदार बागडे, मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, तलाठी हरिश्चंद्र जाधव यांच्या पथकडॉ.सुहास जाधवर व डॉ.आश्विनी जाधवर दाम्पत्यावर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ?न्यु धनश्री या नावाने पूर्वीच्याच जागेवर हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केला जात होता. असे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप बेलपत्रे यांनी सांगितले.

सांगोला दि ८ :   येथील न्यू धनश्री हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे. यामुळे वैद्यकीय क्षेत्रात  खळबळ उडाली आहे. यापूर्वी याच हॉस्पिटलवर केलेल्या कारवाईत सोनोग्राफी मशीन सील असताना पुन्हा न्यु धनश्री या नावाने वैद्यकीय सेवा सुरू करण्याचा उद्योग डॉ. जाधवर दाम्पत्यांनी सुरू केला होता.  बुधवारी केलेल्या कारवाईत दवाखान्यातील आॅपरेशन थिएटर व प्रसूतिगृह सील करून सर्व कागदपत्रे जप्त केली व डॉ. सुहास जाधवर व डॉ.आश्विनी जाधवर या डॉक्टर दाम्पत्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. याबाबत मिळालेली माहिती अशी की, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमेध अंदूरकर यांच्या आदेशानुसार काल बुधवार ७ फेब्रुवारी रोजी  सायंकाळी ५ च्या सुमारास सांगोला शहरांतर्गत  कडलास नाक्यावरील न्यू धनश्री हॉस्पिटलवर विधी समुपदेशक अ‍ॅड. रामेश्वरी माने, कक्ष सेवक हनिफ शेख, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदीप बेलपत्रे, नायब तहसीलदार बागडे, मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, तलाठी हरिश्चंद्र जाधव यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. यावेळी हॉस्पिटलमधील कागदपत्रांची पाहणी केली असता अनेक त्रुटी आढळून आल्या. तर एका महिलेचा बेकायदेशीर गर्भपात केल्याचे व गर्भामध्ये अर्भकाचा मृत्यू झाल्याचा गर्भपात तसेच एका अविवाहित मुलगी गर्भपात करण्यासाठी दाखल करण्यात आली होती असे कागदपत्रांवरून या पथकाच्या  निदर्शनास आल्याने त्यांनी सर्व कागदपत्रे जप्त करून प्रसूतिगृह व आॅपरेशन थिएटर सील केले आहे. डॉ.सुहास जाधवर व डॉ.आश्विनी जाधवर या डॉक्टर दाम्पत्यावर  रात्री उशिरापर्यंत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.डॉ.सुहास जाधवर यांनी शासनाची फसवणूक करून खोटी कागदपत्रे सादर करून न्यु धनश्री या नावाने पूर्वीच्याच जागेवर हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर गर्भपात केला जात होता. असे वैद्यकीय अधीक्षक डॉ संदीप बेलपत्रे यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरhospitalहॉस्पिटल