शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धनादेश परत आला तर वीजग्राहकांना दीड हजार दंड

By appasaheb.patil | Updated: November 30, 2018 12:34 IST

१ डिसेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे१ डिसेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकतीच मंजुरी दिली आता १ डिसेंबरपासून १५०० रुपये किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड

सोलापूर : वीज बिलाचा भरणा केलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाऊंस) झाल्यास ३५० रुपयांऐवजी आता १५०० रुपये दंड किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल त्या रकमेचा दंड लावण्यात येणार आहे.

महावितरणने वीजदराच्या निश्चितीकरणासाठी दाखल केलेल्या मध्यावधी आढावा याचिकेच्या सुधारित आदेशामध्ये महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकतीच मंजुरी दिली आहे.  १ डिसेंबरपासून या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यापूर्वी वीज बिलापोटी दिलेला धनादेश कोणत्याही कारणासाठी बाऊंस झाल्यास वीजग्राहकांना ३५० रुपये दंड लावण्यात येत होता; मात्र आता १ डिसेंबरपासून १५०० रुपये किंवा बँक चार्जेस यापैकी जी रक्कम जास्त असेल तो दंड म्हणून लावण्यात येत आहे.

वीज बिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते, परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीज बिलाची रक्कम भरतात.

धनादेश वटण्यास साधारणत: तीन ते चार दिवसांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे मुदतीनंतर वीज बिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना धनादेशाद्वारे भरलेली रक्कम थकबाकी म्हणून पुढील बिलात लागून येते किंवा कोणत्याही कारणाने धनादेश बाऊंस झाला आर्थिक दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते. वीजदेयकांपोटी दिलेल्या चेक बाऊंसची विविध कारणे असली तरी प्रामुख्याने चुकीची तारीख टाकणे, खाडाखोड करणे, चुकीची स्वाक्षरी करणे आदी प्रकार दिसून येत आहेत.

आॅनलाईनवर भर द्या...च्महावितरणने घरबसल्या वीज बिल भरण्यासाठी वेबसाईट, मोबाईल अ‍ॅप किंवा ईसीएसद्वारे सोय उपलब्ध आहे. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी या आॅनलाईन सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणonlineऑनलाइनbillबिल