शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:54 IST

Baliram Kaka Sathe Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादी कॉग्रेसने जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्याने बळीराम काका साठे दुखावले गेले आहेत. पक्षाकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर त्यांनी मौन सोडले. 

Maharashtra News: सोलापूरच्या जिल्हाध्यक्षपदावरून बळीराम काका साठे यांची हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईने दुखावलेल्या साठेंनी आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असे ठरवले आहे, अशा स्पष्ट शब्दात आपल्याला भावना वाट मोकळी करून दिली. 'आता परत जाण्याचा प्रश्नच येत नाही. विविध पक्षांचे निरोप येत आहेत, मात्र विचारांती कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेण्यात येईल', असे ते म्हणाले. 

लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

'कोणत्याही पक्षात गेलो तरी आमदार सुभाष देशमुख यांच्या मुलाला जिल्हा परिषद निवडणुकीत निवडून आणायचे आहे', असा शब्द बळीराम काका पाटील यांनी यावेळी दिला. 

ज्या पद्धतीने काढले ते विसरता येणार नाही -साठे

'मी राजकारणात विश्वासाने कोणाचा गळा कापला नाही त्यामुळे विश्वासाने राजकारण करणाऱ्यांशी जमवून घेतो. कितीही आव्हाने असताना शरद पवार यांची साथ सोडली नाही मात्र जिल्हाध्यक्ष पदावरून हटवताना जी पद्धत अवलंबली ती विसरता येणारी नाही', अशी खंत बळीराम काका साठेंनी व्यक्त केली. 

वाचा >>नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!

'आता पुन्हा पवारसाहेबांकडे जायचे नाही, असे ठरविले आहे. फक्त कुठे जायचे हा निर्णय घेण्यासाठी थोडं थांबावे लागणार आहे', असे ते कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले. 

बळीराम काका साठेंना विविध पक्षांचे निरोप

'भाजपचे आमदार सुभाष देशमुख हे फोनवर बोलले व निर्णय घेण्यासाठी गडबड करू नका म्हणाले. त्यांची प्रत्यक्षात भेटीत चर्चा होईल', असे साठेंनी संगितले. 

आमदार देशमुख यांनीही काकांशी भेटून चर्चा करणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याचा पवारसाहेबांचा फोन येईल, असा निरोप आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनीही काकांशी संपर्क केला आहे.

अजित पवारांकडे जाण्याची सूचना

तालुक्यातील विविध गावचे लोक काकांना भेटत आहेत. काहींनी आहे तिथेच बरे आहे, बऱ्याच लोकांनी अजित पवार गटात जावे असे सुचविले तर काहींनी तुम्ही काही निर्णय घ्या, असे सांगत आहेत.

मी जिल्हाध्यक्ष असताना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे बी फार्म 3 खा. मोहिते-पाटील यांच्याकडे होते. माझ्या मोहोळ मतदारसंघाच्या उमेदवारांचा बी फार्म घेण्यासाठी मोहिते-पाटील यांच्याशी वादावादी करावी लागल्याचे काकांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसSolapurसोलापूरPoliticsराजकारण