मी आजही अपक्ष आमदार, माझे नेते मात्र अजित पवारच; संजय शिंदेची सावध भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 09:39 AM2021-11-19T09:39:14+5:302021-11-19T09:39:41+5:30

कोरोनामुळे खंड पडलेला आमदार आपल्या दारी उपक्रम पुन्हा सुरु

I am still an independent MLA, but my leader is Ajit Pawar; Sanjay Shinde's cautious role | मी आजही अपक्ष आमदार, माझे नेते मात्र अजित पवारच; संजय शिंदेची सावध भूमिका

मी आजही अपक्ष आमदार, माझे नेते मात्र अजित पवारच; संजय शिंदेची सावध भूमिका

Next

कुर्डूवाडी / करमाळा : नगरपरिषदेच्या निवडणुका बाबत कुर्डूवाडी व करमाळा शहरातील आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार आहे. मी राज्यातील महाविकास आघाडीला पाठिंबा केवळ विकास कामांच्या मुद्द्यांवर दिला असून मी आजही अपक्ष आमदार आहे, पण माझे नेते हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेच आहेत, अशी सावध भूमिका आमदार संजयमामा शिंदे मांडली.

निमगाव(टे) (ता. माढा) येथे आमदार आपल्या दारी उपक्रमाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. करमाळा विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या दारी ही योजना गेल्या वर्षभरापासून राबवत असून मध्यंतरी कोरोनामुळे त्यात खंड पडला होता. पण आता नव्या जोमाने प्रत्येक मतदारसंघातील जिल्हा परिषद गटात,पंचायत समिती गणात जाऊन सर्वसामान्य माणसांची कामे मार्गी लावण्यात येणार आहे. या उपक्रमाला दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता रावगाव येथून सुरुवात करण्यात येणार आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे म्हणाले, करमाळा तालुक्यातील कोणत्याही संस्थेचे नुकसान होईल असे काम करणार नसून आर्थिक अडचणीत आलेल्या संस्थाही बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यात कोणत्याही प्रकारचे राजकारण करणार नसल्याचे त्यांनी सांगून बेंद ओढ्याला पाणी सोडण्याबाबत सर्व प्रकारच्या मंजुरी झाल्या असून त्याची कार्यवाही करण्यात येईल व सीना माढा उपसा सिंचन योजनेंतर्गत अंबाड,कुर्डू, पिंपळखुटे, शिराळ या गावालाही पाणी मिळेल याबाबत काम सुरू असल्याचे सांगितले. करमाळा तालुक्यात एक सूतगिरणी उभी करणार असल्याचा मानस त्यांनी यावेळी बोलून त्याची कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य उद्धव माळी, डॉ. विकास वीर, राष्ट्रवादी युवकचे तुषार शिंदे, राजेंद्र बाबर, हिंगणीचे माजी सरपंच हनुमंत पाटील आदी उपस्थित होते.

वरिष्ठांना बोलून वीज तोडणी थांबविणार

राज्य सरकारची सध्या आर्थिक परिस्थिती खूप गंभीर आहे. तशीच महावितरण कंपनीची आहे. त्यामुळे त्यांनी वीज बिल वसुली मोहीम काढली असेल पण साखर कारखाने आता सुरू झाले आहेत. त्याचे पहिले बिल येईपर्यंत तरी महावितरण कंपनीने थांबायला हवे. याबाबत वरिष्ठांना बोलणार असून लवकरच त्यात बदल होईल, असे आश्वासन आमदार संजयमामा शिंदे यांनी दिले.

Web Title: I am still an independent MLA, but my leader is Ajit Pawar; Sanjay Shinde's cautious role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.