शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, टॅमी फ्लूने सोलापुरातील कोरोनाच्या रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 11:30 IST

‘आलं अन् तुळशी’चा दिला जातो काढा; आयसोलेशनमध्ये टीव्हीसोबत पुस्तकांचीही सुविधा

ठळक मुद्देरुग्ण बरा होऊन घरी गेल्यास त्याला इतर सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक द्यायला हवीकोरोना आजारातून बाहेर पडलेला रुग्ण आता सामान्य झालेला असतोइतरांप्रमाणे मास्क वापरायला हवे. तसेच इतरांपासून साडेतीन फूट अंतर राखायला हवे

सोलापूर : कोरोना आजारावर अद्याप लस उपलब्ध झाली नसली तरी त्यावर उपचार करणे शक्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) रुग्णांना सकस आहार व रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारी औषधे देण्यात येतात. यामुळे या आजारावर उपचार करणे शक्य होते.

गंभीर व सौम्य लक्षणे यानुसार रुग्णांमध्ये विभागणी करण्यात येते. ज्या रुग्णाला श्वास घेण्यास त्रास होतो त्याला आयसीयू (अतिदक्षता विभाग) मध्ये अ‍ॅडमिट केले जाते, तर इतर रुग्णांना सामान्य वॉर्डामध्ये (आयसोलेशन वॉर्ड) अ‍ॅडमिट केले जाते. या सामान्य वॉर्डामध्ये आॅक्सिजन देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रुग्णांवर उपचार करताना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, टॅमी फ्लू ही औषधे दिली जातात. रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून विटॅमिन सी, विटॅमिन बी १२ ची औषधे दिली जातात. यासोबत प्रथिनेयुक्त सकस आहार (हायप्रोटिन डायट) यात अंडी, दूध, पोळी-भाजी, वरण, भात, चिक्की यांचा समावेश असतो.

रुग्णांचे मन लागावे म्हणावे टीव्हीची सोय करण्यात आली आहे. आयसीएमआर (इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च) यांच्या नव्या नियमाप्रमाणे रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यापासून सात ते दहाव्या दिवशी त्याला ताप व इतर लक्षणे नसल्यास त्याला दहाव्या दिवशी घरी सोडले जाते.ज्या रुग्णामध्ये लक्षणे आहेत त्यांचा १४ व्या दिवशी पुन्हा एकदा दोनवेळा स्वॅब घेऊन तो निगेटिव्ह आल्यास घरी सोडले जाते. दोनदा स्वॅबची चाचणी केली जाते. यात रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्याला घरी सोडण्यात येते.

रुग्णांना मोबाईल वापरण्यास मुभा दिली जाते. जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्कात राहू शकतात. रुग्णालयात काम करणाºया काही कर्मचाºयांनाही वाईट अनुभव आला. त्यामुळे अशा कर्मचाºयांच्या राहण्याची सोय रुग्णालय व्यवस्थापनाने केली आहे.

..असा असतो रुग्णांचा दिनक्रम- सकाळी आंघोळीनंतर ७:३० वाजता चहा दिला जातो. ८:३० वाजता नाष्टा तर ११ वाजता काढा दिला जातो. एक दिवस तुळशीच्या पानांचा तर एक दिवस आल्याचा असा आलटून-पालटून काढा दिला जातो. दुपारी १२.३० ते एकच्या दरम्यान जेवण दिले जाते. सायंकाळी पाच वाजता चहा व बिस्कीट दिले जातात. रात्री ८ ते ८.३० दरम्यान जेवण दिले जाते. सकाळी नाष्टा तर रात्री जेवणानंतर औषधे दिली जातात. अतिदक्षता विभागात असणाºया (श्वास घेण्यास त्रास असणाºया) रुग्णांना दिवसातून तीन वेळा इंजेक्शन दिले जाते. रुग्ण हे त्याच्या आवडीप्रमाणे पुस्तक वाचतात व टीव्ही देखील पाहतात.

रुग्ण बरा होऊन घरी गेल्यास त्याला इतर सामान्य नागरिकांप्रमाणे वागणूक द्यायला हवी. पुढील सात दिवस त्याने काळजी घ्यावी. कोरोना आजारातून बाहेर पडलेला रुग्ण आता सामान्य झालेला असतो. त्यानेही इतरांप्रमाणे मास्क वापरायला हवे. तसेच इतरांपासून साडेतीन फूट अंतर राखायला हवे.- डॉ. औदुंबर मस्के, वैद्यकीय अधीक्षक, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस