पती चारित्र्यावर संशय घेत होता, तिने विष प्राशन करुन जीवन संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:26 IST2021-08-14T04:26:55+5:302021-08-14T04:26:55+5:30

अश्लेषा संतोष माने (वय २३, रा. पेनूर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसात पती व सासू सासरा ...

Husband was suspicious of the character, she ended her life by consuming poison | पती चारित्र्यावर संशय घेत होता, तिने विष प्राशन करुन जीवन संपविले

पती चारित्र्यावर संशय घेत होता, तिने विष प्राशन करुन जीवन संपविले

अश्लेषा संतोष माने (वय २३, रा. पेनूर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मोहोळ पोलिसात पती व सासू सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष बाळू माने, सुरेखा बाळू माने, बाळू सिद्धू माने अशी संशयित आरोपींची नावे आहेत. दत्ता लक्ष्मण जाधव (रा. हिवरे ता. मोहोळ) यांची बहीण अश्लेषा हिचा विवाह पेनूर येथील संतोष बाळू माने याच्याशी २३ नोव्हेंबर २०१६ रोजी झाला होता. लग्नानंतर पहिले सहा महिने सासरच्या लोकांनी अश्लेषा तिला व्यवस्थित नांदविले. त्यानंतर शेतात घर बांधण्यासाठी माहेरहून पैसे घेऊन ये अशी मागणी करू लागले. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती संतोष तिला मारहाण करत होता. या त्रासाला कंटाळून अश्लेषा यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले तिचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे हे करीत आहेत.

Web Title: Husband was suspicious of the character, she ended her life by consuming poison