चौघांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:21 IST2021-04-24T04:21:52+5:302021-04-24T04:21:52+5:30

पाचेगांव खु. येथील जानकाबाई पोपट मिसाळ यांच्या घरासमोर येऊन सागर विश्वंभर मिसाळ याने आम्हाला कोर्टातून नोटीस पाठवता काय, ...

Husband and wife were injured in the beating of the four | चौघांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

चौघांच्या मारहाणीत पती-पत्नी जखमी

पाचेगांव खु. येथील जानकाबाई पोपट मिसाळ यांच्या घरासमोर येऊन सागर विश्वंभर मिसाळ याने आम्हाला कोर्टातून नोटीस पाठवता काय, तुला कॅनॉलमध्ये गेलेल्या जमिनीचे पैसे देत नाही या कारणावरून जवळच पडलेल्या खोऱ्याचा दांडा पाठीत मारून शिवीगाळ करू लागला. त्यावेळी जानकाबाई यांचा मुलगा हृषिकेश याने वडिलांना फोन करून शेतातून घरी बोलविले. त्यावेळी भांडणे सोडवताना जानकाबाई यांचे पती पोपट यांना सागर मिसाळ याने तुला पण बघतो, असे म्हणून गच्चीला धरून खाली पाडले. त्यावेळी सागरचा चुलतभाऊ धोंडिराम दगडू मिसाळ याने त्यांच्या डोक्यात दगड मारून जखमी केले.

त्यावेळी जानकबाई व मुलगा हृषिकेश असे पोपट यांना सोडविण्याचा प्रयत्न करत असताना सुरेखा विश्वंभर मिसाळ व संध्या सागर मिसाळ या दोघींनी जानकाबाई यांच्या केसाला धरून हाताने, लाथा-बुक्क्यांनी, मारहाण करून शिवीगाळ केली. शेजारी राहणारे धनाजी मिसाळ, नवनाथ मिसाळ यांनी भांडणे सोडवासोडव केली असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत जानकाबाई मिसाळ यांनी फिर्यादी दिली. यावरून पोलिसांनी सागर विश्वंभर मिसाळ, धोंडिराम दगडू मिसाळ, सुरेखा विश्वंभर मिसाळ, संध्या सागर मिसाळ यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Husband and wife were injured in the beating of the four