एकाच वॉर्डात पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:54 IST2021-01-13T04:54:47+5:302021-01-13T04:54:47+5:30

महिम ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी ८ महिला व ७ पुरुष निवडून द्यायचे आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सिद्धनाथ परिवर्तन महाविकास आघाडी ...

Husband and wife in the same ward in the election arena | एकाच वॉर्डात पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

एकाच वॉर्डात पती-पत्नी निवडणुकीच्या रिंगणात

महिम ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी ८ महिला व ७ पुरुष निवडून द्यायचे आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत सिद्धनाथ परिवर्तन महाविकास आघाडी व शेकाप पुरस्कृत सिद्धनाथ बहुजन ग्रामविकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत होत आहे. असे असले तरी वाॅर्ड क्र. २ मधून दोन अपक्षांचे आव्हान असणार आहे. वाॅर्ड क्र. ३ मधून सिद्धनाथ बहुजन ग्रामविकास आघाडीकडून तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष वसंत रुपनर हेही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्याने याठिकाणी चुरस वाढली आहे.

मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले असून दोन्हीही आघाडीच्या उमेदवारांनी होम टू होम मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रचारात रंगत वाढवली आहे. मतदार मात्र, अद्यापही कोणाचा कोणाला अंदाज येऊ देत नाहीत. अशा परिस्थितीत कोणती आघाडी बाजी मारणार हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

Web Title: Husband and wife in the same ward in the election arena