शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

पंढरपूर तालुक्यात नदीकाठी शेकडो हेक्टर उसाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 12:39 IST

शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान; प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा 

ठळक मुद्देपटवर्धन कुरोली येथील रेणुकामाता मंदिर पाण्यात गेले पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली गेल्याने या परिसराचा संपर्क तुटला भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठचे शेतकरी हतबल

पटवर्धन कुरोली : सोलापूर जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असली तरी पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या तुफान पावसामुळे भीमा नदीला पूर आला आहे. पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली गेल्याने पिराची कुरोली, अकलूज परिसराकडे सुरू असलेला संपर्क बंद झाला आहे. नदीकाठचे शेकडो हेक्टर उसाचे पीक पाण्याखाली गेल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठवरील पटवर्धन कुरोली, पिराची कुरोली, देवडे, खेडभोसे, आव्हे, तरटगाव, खेडभाळवणी, कौठाळी, शिरढोण, गुरसाळे आदी गावांमध्ये सखल भागात पाणी शिरले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबांवर स्थलांतर करण्याची वेळ आली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देऊन इतर ठिकाणी राहण्याचा सल्ला दिला आहे. 

पटवर्धन कुरोली येथील रेणुकामाता मंदिर पाण्यात गेले आहे. पटवर्धन कुरोली बंधाºयावरून अकलूज, सांगोला परिसरात मोठी वाहतूक असते. मात्र या वाहतुकीचा मुख्य केंद्रबिंदू असणारा पटवर्धन कुरोली बंधारा पाण्याखाली गेल्याने या परिसराचा संपर्क तुटला आहे.

खंडित वीजपुरवठ्यामुळे हाल- भीमा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठचे शेतकरी हतबल झाले आहेत. अशातच वीज वितरणने नदीकाठच्या परिसरातील काही रोहित्रांचा वीजपुरवठा बंद केला आहे. यात मुख्य लाईनवरच अनेक वाड्यावस्त्यांचा वीजपुरवठा अवलंबून आहे. त्यामुळे नदीपासून काही अंतरावर असलेली रोहित्रे बंद करण्याचा सपाटा वीज वितरणने सुरू केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भीमा नदी दुथडी भरून वाहत असली तरी काही वाड्यावस्त्यांवर वीज व पिण्याच्या पाण्यासाठी नागरिक, जनावरांचा संघर्ष सुरू आहे.

ऊस पाण्याखाली- चालू वर्षी असलेल्या भीषण दुष्काळाशी सामना करत नदीला पिण्यासाठी सोडलेल्या पाण्यावर नदीकाठच्या शेतकºयांनी मोठ्या कष्टाने शेकडो हेक्टर उसाचे संगोपन केले होते. शेकडो हेक्टर उसात पुराचे पाणी शिरल्याने ऊस भुईसपाट झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकfloodपूरFarmerशेतकरीagricultureशेती