शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

माणुसकी; सोलापुरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना विशेष बसने पाठवले मध्यप्रदेशात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 09:16 IST

मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी  पाेलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांचे टिव्ट करून केले काैतुक...!

सोलापूर : ऊसतोडीसाठी मध्य प्रदेशातून दक्षिण सोलापुरात आलेल्या आणि ऊसतोडीचा पुरेसा अनुभव नसल्यामुळे तेथेच अडकून पडलेल्या ५२ मजुरांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मदतीचा हात दिला. या सर्व मजुरांना विशेष बसने मध्य प्रदेशात परत पाठविण्यात आले. या घटनेची दखल घेऊन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांची ट्विटरच्या माध्यमातून प्रशंसा केली आहे.

मध्य प्रदेशातील कटनी येथून सुमारे नऊशे किलोमीटर अंतरावरून रोजगारासाठी ५२ मजूर व त्यांचे कुटुंबीय ऊसतोडणीच्या कामासाठी सोलापुरात आले होते. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे मुकादम सुनील मोटे यांनी अनामत रकमा घेऊन ऊसतोडीचे काम सुरू असताना या मजुरांना कामाचा अनुभव नव्हता. त्यामुळे ऊसतोड करणे जमत नव्हते. काम करता येत नसल्यामुळे मजुरीची रक्कमही मिळणे बंद झाले होते.

मजुरीची रक्कम मिळत नसल्याने उपासमार होऊ लागली. त्यामुळे वैतागलेले हे सर्व मजूर मध्य प्रदेशात परत पाठविण्याचा आग्रह धरत होते. परंतु त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. मुकादमानेही या सर्व मजुरांना डांबून ठेवले होते.

दरम्यान, आपली अडचण संबंधित मजुरांनी मध्य प्रदेशातील कटनीच्या जिल्हाधिका-यांना कळविली. त्याची लगेचच दखल घेत कटनीच्या जिल्हाधिका-यांनी सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याशी संपर्क साधला. सातपुते यांनीही यासंदर्भात तेवढीच संवेदनशीलता दाखवत कंदलगाव येथे अडकलेल्या सर्व मजुरांना त्यांच्या गावी परत पाठविण्याची व्यवस्था केली.

विशेष बसमधून सर्व मजुरांना मध्य प्रदेशाच्या सीमेवर पाठविण्यात आले. त्यासाठी मुकादम तथा टोळी प्रमुख व ऊसतोड मजुरांमध्ये समन्वय घडवून प्रत्येक मजुराला दोन हजार रूपये मजुरीची रक्कम उपलब्ध केली गेली. शिवाय प्रवासात जेवण, सोलापुरी चादर, टॉवेल तसेच सॕनिटायझर व मुखपट्ट्या पुरविण्यात आल्या. मध्य प्रदेशाच्या सीमेवर तेथील प्रशासनाने सर्व मजुरांना त्यांच्या गावी पाठविण्याची जबाबदारी पार पाडली.

तक्रार नसल्याने कारवाई नाहीमध्य प्रदेशातून सुमारे नऊशे किलोमीटर दूर अंतरावरून केवळ रोजगारासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात आलेल्या मजुरांना ऊसतोडीच्या कामाचा अनुभव नव्हता. त्यातून त्यांच्या अडचणी वाढल्या. गावी परत जाण्याची त्यांची मागणी होती. परंतु त्यांना तसेच डांबून ठेवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी हस्तक्षेप केला असता विचारपूस करूनही संबंधित मजुरांनी कोणतीही तक्रार केली नाही. मूळ गावी परत जाणे हेच त्यांच्यासाठी महत्वाचे होते. तक्रारीअभावी पोलिसांना संबंधितांवर कायदेशीर कारवाई करता आली नाही.-तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसMadhya Pradeshमध्य प्रदेश