शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकी; वानराच्या अपघाती मृत्यूनंतर गावकºयांनी केले अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 10:23 IST

लऊळ : एरव्ही अपघातानंतर मदतीसाठी न थांबता आपल्या कामाला लागणाºया धावपळीच्या जमान्यात माढा तालुक्यातील लऊळ येथील गावकºयांनी अपघातामध्ये मृत ...

ठळक मुद्देतिसरा दिवसही पाळला, मुक्या प्राण्यांवरही प्रेम करणाºया गावकºयांच्या संवेदनावानरावर अंत्यसंस्कार व तिसºयाचा धार्मिक विधी हनुमान मंदिराचे पुजारी चंद्रकांत कोळी यांनी पार पाडला

लऊळ : एरव्ही अपघातानंतर मदतीसाठी न थांबता आपल्या कामाला लागणाºया धावपळीच्या जमान्यात माढा तालुक्यातील लऊळ येथील गावकºयांनी अपघातामध्ये मृत झालेल्या वानरावर अंत्यसंस्कार केले. एवढेच नाही तर त्याचा तिसरा दिवसही पाळला. माणसांएवढेच मुक्या प्राण्यांवरही प्रेम करणाºया या गावकºयांच्या संवेदना चर्चेच्या ठरल्या आहेत.

रविवारी एका अज्ञात वाहनाच्या अपघातात सकाळी ८:१५ वाजण्याच्या सुमारास उजनी रस्त्यावर वडाचामळा येथे एका वानराचा मृत्यू झाला. त्याला गावातील गणेश लोकरे यांनी पाहिले. ही माहिती त्यांनी गावकºयांना सांगितली. हा हा म्हणता गावभर ही वार्ता पसरली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. वानरावर  माणसाप्रमाणे अंत्यसंस्कार विधी करण्याचे  सर्वानुमते ठरले. त्यानुसार वडाचामळा येथील वस्तीवर रस्तालगत धार्मिक पध्दतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगळवारी तिसºया दिवसाचा विधीही धार्मिक पध्दतीने करण्यात आला. एवढेच नाही तर वानराच्या दहाव्याचाही धार्मिक विधी करण्याचा निर्णय गावकºयांनी घेतला आहे.

वानरावर अंत्यसंस्कार व तिसºयाचा धार्मिक विधी हनुमान मंदिराचे पुजारी चंद्रकांत कोळी यांनी पार पाडला. यावेळी सयाजी लोकरे, राजेंद्र लोकरे, गणेश लोकरे, किसन लोकरे, दरलिंग लोकरे, बंडू लोकरे, भाऊ लोकरे  , ज्ञानेश्वर लोकरे, राम, डॉ.शिवाजी नलवडे, बबन बोडके, कुलदीप लोकरे, रामहरी व्यवहारे, बाबू लोकरे, औदुंबर लोकरे, प्रवीण लोकरे, धनाजी जोशी, अर्जुन व्यवहारे, भाऊराव नलवडे आदींसह गावकरी आणि महिला उपस्थित होत्या. 

दोन वानरांचीही उपस्थिती- वडाचामळा येथे मृत वानरावर अंत्यसंस्कार होताना दोन वानर उपस्थित असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. बहुधा मृत वानर त्या दोन वानरांच्या कळपातील असावे, असा सर्वांचा अंदाज आहे. माणसांसारखं मुक्या प्राण्यांनाही भावना असतात, याची प्रचिती या घटनेच्या निमित्ताने सर्वांना आली. 

टॅग्स :SolapurसोलापूरAccidentअपघातDeathमृत्यूMonkeyमाकड