शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

विठ्ठला उपाशीपोटी झोपलेली लेकरे तुला कशी बघावतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 19:54 IST

पालकमंत्री जितेंद्र आव्हाडाचे विठ्ठलाला साकडे; संत चोखामेळा विठ्ठलाला निरोप पोहोचव...

ठळक मुद्देपालकमंत्री जितेंद्र आव्हाड सोलापूर जिल्हा दौऱ्यावरकोरोना च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील परिस्थितीचा घेतला आढावाआरोग्याच्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांना केल्या विविध सूचना

पंढरपूर : सध्या महाराष्ट्रावर कोरोना विषाणूचे संकट आले आहे. या कोरोना विषाणूचा नायनाट करण्याची ताकद फक्त विठ्ठला तुझ्याकडेच आहे. तुला तुझी लेकरे उपाशीपोटी झोपलेली कसे बघवत आहे. या संकटातून महाराष्ट्राला बाहेर काढ असे साकडे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विठ्ठलाकडे घातले असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

कोरोनाबाबत परिस्थिती जाणून घेण्यासाठी पालकमंत्री जितेंद्र आव्हाड हे पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी श्री विठ्ठलाचे कळस दर्शन, नामदेव पायरीचे दर्शन व संत चोखा महाराज यांच्या समाधीला नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी तडफडतोय, शेतमजुरांना काम नाही. रोजंदारीवर जाणारा कामगार अन्ना विना उपाशी झोपतोय. अनेक लोक बेघर झाले आहेत, त्यांना उपाशी झोपण्याशिवाय पर्याय उरला नाही. महाराष्ट्रातील जनतेला या संकटातून बाहेर काढ. असे साकडेमहाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने घालण्यासाठी मी  पंढरपुरात आलो आहे. परंतु विठ्ठलाचे मंदिर बंद असल्याने विठ्ठलाचा परमभक्त संत चोखा महाराज यांना नतमस्तक होऊन माझे साकडे विठ्ठलापर्यंत पोहोचव अशी विनवणी केली असल्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरJitendra Awhadजितेंद्र आव्हाडPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस