३५ वर्षे राजकारणात असणाऱ्यांना खाती कशी समजत नाहीत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:16 IST2021-06-18T04:16:20+5:302021-06-18T04:16:20+5:30
ते म्हणाले की, वैरागचा विषय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मंत्रालयाकडे येत नाही. तो वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री अमित देशमुख ...

३५ वर्षे राजकारणात असणाऱ्यांना खाती कशी समजत नाहीत?
ते म्हणाले की, वैरागचा विषय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मंत्रालयाकडे येत नाही. तो वैद्यकीय शिक्षण व संशोधनमंत्री अमित देशमुख यांच्याकडे येतो. लवकरच वैराग ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र, वसतिगृह व निवासस्थानाचा प्रश्न सुटणार आहे.
तसेच एमआयडीसीच्या उभारणीला माजी लोकप्रतिनिधींचा तीव्र विरोध आहे. त्यांचे बंधू अध्यक्ष आहेत. येथे शासकीय वसाहत झाली तर आपले महत्त्व कमी होईल, असे त्यांना वाटत आहे. आरक्षित असलेल्या आणखी वाढीव जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. त्याठिकाणच्या प्लॉटचे दर निम्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बार्शी उपसा सिंचन योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.
--------
त्यांनी साधे नगरसेवक व्हावे !
माजी मंत्री दिलीप सोपल यांची ताकद मी समजू शकतो. आमच्या दोघात काय पाच-दहा हजारांची लढाई व्हायची ती होईल; पण बाकीच्यांचे काय हो? त्यांनी साधे नगरसेवक तरी होऊन दाखवावे. माझे त्यांना चॅलेंज आहे, असाही टोला राऊत यांनी लगावला.