शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; सोलापूरकडे येणारे लोंढे तपासणार कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 12:20 IST

सोलापूर जिल्हा प्रशासनासमोर आव्हान; तपासणी पथक नेमण्याची मागणी

ठळक मुद्देमुंबई-पुण्यात साथीच्या आजारामुळे लोक आपल्या गावाकडे परतत आहेतसंशयित रुग्ण आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला कळवावेरुग्णाने स्वत:हून सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे

राकेश कदम

सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई आणि पुण्यात ‘शटडाऊन’ची तयारी सुरू आहे. त्यामुळे या शहरातील नागरिकांचे लोंढे मूळ गावी सोलापूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यांची तपासणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. संशयित रुग्णांनी रुग्णालयात दाखल होऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे. 

सोलापुरातील लाखो लोक पुणे, हैदराबाद आणि मुंबईत रोजगारासाठी स्थायिक झाले आहेत. पुणे आणि मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. मुंबई विमानतळावर प्रतिबंध घातल्यामुळे अनेक विमाने पुणे विमानतळावर उतरत आहेत. पुण्यात उतरलेली मंडळी थेट आपल्या गावी येत आहेत. गेल्या आठ दिवसांत पुणे आणि मुंबईतून शेकडो लोक सोलापुरात पोहोचले आहेत. आणखी बरेच लोक रेल्वे, एसटी, खासगी गाड्यांनी दाखल होत आहेत. 

या लोकांची तपासणी होत नसल्याचे पाहायला मिळते. ग्रामीण भागात पुण्यातील आलेल्या लोकांनी आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे आवाहन केले जाते. दवंडीही दिली जाते. पण शहरात याबद्दल जनजागृती होत नसल्याचे पाहायला मिळते. 

मागच्या काही दिवसांत हुतात्मा एक्स्प्रेस रिकामी पुण्याला गेली. परत येताना मात्र या गाडीचे डबे भरलेले होते. एसटी स्टॅँडवरही बरेच लोक दाखल होतात. खासगी वाहनाने येणाºयांची संख्या वाढतच आहे. प्रशासनाने एसटी स्टॅँड आणि टोलनाक्यावर तपासणी नेमणे आवश्यक आहे. - बाबा मिस्त्री,नगरसेवक, कॉँग्रेस

मुंबई-पुण्यात साथीच्या आजारामुळे लोक आपल्या गावाकडे परतत आहेत. त्यांना रोखता येणार नाही. त्यांना गावाकडे येऊन  स्वस्थ बसू द्या. संशयित रुग्ण आढळल्यास नागरिकांनी प्रशासनाला कळवावे. रुग्णाने स्वत:हून सरकारी रुग्णालयात दाखल व्हावे. - मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याrailwayरेल्वेHealthआरोग्यSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय