मजरेवाडीत घरफोड्यांचे सत्र तीन घरे फोडली: दीड लाखाचा ऐवज लंपास

By Admin | Updated: May 7, 2014 00:11 IST2014-05-06T20:57:51+5:302014-05-07T00:11:34+5:30

सोलापूर : सोलापुरात चोरट्यांची हाथसफाई सुरूच असून, मजरेवाडी परिसरात ३ बंद घरे फोडली तर जोडभावी पेठेत महिलेचे मंगळसूत्र पळविण्याची लागोपाठ चौथी घटना घडली.

House house in Majarewadi blasted three houses: One and a half lamps | मजरेवाडीत घरफोड्यांचे सत्र तीन घरे फोडली: दीड लाखाचा ऐवज लंपास

मजरेवाडीत घरफोड्यांचे सत्र तीन घरे फोडली: दीड लाखाचा ऐवज लंपास

सोलापूर : सोलापुरात चोरट्यांची हाथसफाई सुरूच असून, मजरेवाडी परिसरात ३ बंद घरे फोडली तर जोडभावी पेठेत महिलेचे मंगळसूत्र पळविण्याची लागोपाठ चौथी घटना घडली.
मजरेवाडीतील लहू महादेव भोसले (रा. प्लॉट नं. ७१, यशोदानगर) यांचे बंद घर फोडून चोरट्याने घरातील रोकड व दागिने चोरून नेले. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमाराला ही धाडसी चोरी झाली. चोरट्यांनी भोसले यांच्या घराचा कुलूप व कोयंडा कशानेतरी तोडला व घरात प्रवेश केला. घरातील सामानाची उलथापालथ करून सोन्याचे दागिने व रोकड असा ९० हजारांचा ऐवज लंपास केला. त्यांच्या शेजारी राहणारे कालिदास येडगे यांच्याही बंद घराचा कुलूपकोयंडा तोडून आतील साडेआठ हजारांची रोकड चोरट्याने पळविली. तसेच गुलाब बाबानगरातील जनार्दन गोविंद ढवळे यांचे घर फोडून चोरीचा प्रयत्न झाला. चोरट्याने खिडकीचे गज उचकटून आत प्रवेश केल्याचे दिसून आले.
इन्फो....
जोडभावीपेठ पोलीस ठाणे हद्दीत सोमवारी रात्री दहा वाजता पतीच्या मोटरसायकलवरून घराकडे परतणार्‍या विवाहितेचे मंगळसूत्र हिसकावण्यात आले. अर्धा भाग चोरट्याच्या हाती लागला. पतीने चोरट्याचा पाठलाग केला पण चोरटा वेगाने पळून जाण्यात यशस्वी झाला.

Web Title: House house in Majarewadi blasted three houses: One and a half lamps