शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

हॉटेल, लॉजचालकांनी ग्राहकांच्या नोंदी ठेवणे बंधनकारक, सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या सुचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 15:46 IST

सोलापूर : हॉटेल, लॉजचालकांनी सुरक्षतेसाठी ग्राहकांच्या नोंदी बंधनकारक असून त्यानुसार कार्यवाही न केल्यास चालक, मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश शहर पोलीसांनी दिले आहेत़दहशतवाद, नक्षलवाद, अनैतिक मानवी व्यापार तसेच अवैध धंद्यासंदर्भात घ्यावयाच्या दक्षता व जागरूकतेबाबत हॉटेल, चालक, मालकांची शहर आयुक्तालयात बैठक घेण्यात आली़ यावेळी सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक ...

ठळक मुद्देस्वागत कक्षात व पार्किंग विभगाात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यकअनैतिक व्यापार, देहविक्री व्यवसाय आढळून आल्यास चालक, मालकांवर कारवाई

सोलापूर : हॉटेल, लॉजचालकांनी सुरक्षतेसाठी ग्राहकांच्या नोंदी बंधनकारक असून त्यानुसार कार्यवाही न केल्यास चालक, मालकांवर कडक कारवाई करण्यात येईल असे आदेश शहर पोलीसांनी दिले आहेत़

दहशतवाद, नक्षलवाद, अनैतिक मानवी व्यापार तसेच अवैध धंद्यासंदर्भात घ्यावयाच्या दक्षता व जागरूकतेबाबत हॉटेल, चालक, मालकांची शहर आयुक्तालयात बैठक घेण्यात आली़ यावेळी सोलापूर शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बंडगर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले़ दहशतवाद, नक्षलवाद, अनैतिक मानवी व्यापार, अवैध धंद्यासंदर्भात घ्यावयाच्या दक्षता व जागरूकतेबाबत सुचना देण्यात आल्या़ 

दरम्यान, सर्व हॉटेल, लॉज, गेस्ट हाउस चालकांनी स्वागत कक्षात व पार्किंग विभगाात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक आहे़ तसेच परकीय नागरिक तसेच परराज्यातील ग्राहक आपल्याकडे राहत असेल तर त्यांची माहिती दहशतविरोधी पथक, संबंधित पोलीस ठाण्याला कळविणे बंधनकारक आहे़ अनैतिक व्यापार, देहविक्री व्यवसाय आढळून आल्यास चालक, मालकांवर कारवाई करण्यात येईल असे यावेळी सांगण्यात आले़ 

याशिवाय या दिल्या अधिकच्या सुचना

  • - स्वागतकक्षात दर्शनी भागात संबंधित पोलीस ठाणे, पोलीस नियंत्रण कक्ष, दहशतविरोधी पथकाचा संपर्क क्रमांक फलकावर लावण्यात यावा़
  • - कोणत्याही ग्राहकाला वाहन रस्त्यांवर पार्किंग करू नये़
  • - वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दखता घ्यावी़
  • - पर्यटकांचे ओळखपत्र घेऊन नोंदी कराव्यात़
  • - संबंधित हॉटेल, लॉज मधील कामगारांचे पोलीसांकडून चारित्र्य पडताळणी आवश्यक़

अलीकडच्या काळात लॉज, हॉटेल, गेस्ट हाऊसच्या खोल्यांमध्ये, सस्टेबाजी चालत आहे़ पत्यांचा जुगारही खेळता जात आहे़ तसेच देहविक्रीही केली जात आहे़ शहरात यापुढे असे प्रकार आढळून आल्यास हॉटेल, लॉजच्या चालक व मालकांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, शिवाय अशा गुन्ह्यांत त्यांना सहआरोपी करण्यात येईल़- अभय डोंगरेसहा़ आयुक्त, गुन्हे शाखा, सोलापूर शहर पोलीस

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस