शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पिसाळलेली कुत्री पकडण्यापूर्वी काढले जातात फोटो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 19:35 IST

सोलापूर महानगरपालिकेच्यावतीने सप्टेंबरअखेर मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न

ठळक मुद्देफेब्रुवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत शहरातील ४८०० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आलेआता पुन्हा निर्बिजीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहेसप्टेंबरअखेरपासून कुत्री आणि मांजरांच्या निर्बिजीकरणाची मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न

सोलापूर : शहरातील भटकी कुत्री आणि मांजरांच्या निर्बिजीकरणासाठी मनपाकडून दोन दिवसांत निविदा काढण्यात येणार आहे. यावर्षी ४५०० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती मनपाच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालय प्रमुख डॉ. शुभांगी ताजणे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली. 

शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. मोकाट कुत्र्यांनी लहान मुले, महिलांना चावा घेतल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. महापालिकेने २०१४ मध्ये कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम राबविली. ही मोहीम सुमारे सहा महिने चालली. भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना घडल्या, पण महापालिकेने दुर्लक्ष केले. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्या काळात २०१८ मध्ये पुन्हा मोहीम हाती घेण्यात आली. यासाठी ३० लाख रुपये खर्चाची निविदा काढण्यात आली. परंतु, त्यासाठी मक्तेदार पुढे आले नाहीत. डॉ. ढाकणे आणि प्राणी संग्रहालयाच्या प्रमुख डॉ. शुभांगी ताजणे यांनी इतर महापालिकांशी संपर्क करुन मक्तेदाराला बोलाविले.

फेब्रुवारी ते आॅक्टोबर २०१८ या कालावधीत शहरातील ४८०० कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. आता पुन्हा निर्बिजीकरणाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी त्याला मान्यता दिली आहे. पुढील दोन दिवसांत निविदा जाहीर होईल. सप्टेंबरअखेरपासून कुत्री आणि मांजरांच्या निर्बिजीकरणाची मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. ताजणे यांनी सांगितले. डॉ. ताजणे म्हणाल्या, अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड आॅफ इंडियाच्या निर्देशानुसार एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणासाठी १५०० ते १६०० रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. परंतु, त्यापेक्षा कमी दराचा प्रस्ताव देणाºया संस्थेला निविदा दिली आहे. मनपाने मागील वर्षी एका कुत्र्याच्या निर्बिजीकरणासाठी ६५५ रुपयांप्रमाणे निविदा भरणाºया मक्तेदाराला काम दिले होते. यंदाच्या वर्षीही लवकरात लवकर निविदा मंजूर करुन मोहीम सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. 

केवळ उपद्रवी कुत्र्यांची धरपकड मोहीमच्होटगी रोडवरील हत्तुरे वस्ती, शंकरनगर, बसवेश्वरनगर या भागात कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. रविवारी सिध्देश्वर साखर कारखाना परिसरातील बसवेश्वरनगर येथे भटक्या कुत्र्यांनी तीन लहान मुलांना चावा घेतला. या भागात सोमवारी महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाची टीम जाणार आहे. सध्या नागरिकांच्या तक्रारीनुसार पिसाळलेली, उपद्रवी कुत्री पकडण्यात येत आहेत. प्रथम त्यांचे फोटो काढले जातात. केवळ उपद्रवी कुत्र्यांनाच पकडण्यात येत असल्याचे डॉ. ताजणे यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाdogकुत्राPhotograph Movieफोटोग्राफ