शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

बाळे स्थानकावर उभारणार रेल्वेच्या २२ डब्यांमध्ये कोरोना रुग्णांसाठी हाॅस्पिटल

By appasaheb.patil | Updated: April 22, 2021 12:47 IST

जिल्हाधिकारी, मनपा आयुक्तांनी केली पाहणी,  १९८कुलर्सची सोय

आप्पासाहेब पाटीलसोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना पहायला मिळत आहे, तर दुसरीकडे आरोग्य सुविधेच्या कमतरतेमुळे वैद्यकीय यंत्रणेवर प्रचंड ताण येतो आहे. हा ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचे सोलापूर विभाग पुढे येत आहे. सोलापूर विभागातील बाळे रेल्वेस्थानकावर आयसोलेशन कोच उभा करण्यात येणार असून त्याठिकाणी ३०८ कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे. 

लॉकडाउनपासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढच होत गेली. वाढती रुग्णसंख्या पाहून रेल्वे प्रशासनाने रेल्वे बोगीत आयसोलेशन कोच बनविले होते. मात्र मागील वर्षी या कोचचा वापर झाला नाही. हेच रेल्वेचे आयसोलेशन कोच वापराविना होते. मागील वर्षी तयार केलेले कोच सोलापूर विभागात आणि अन्य ठिकाणी आहे तशाच स्थितीत ठेवण्यात आलेले होते. मात्र यंदा रुग्णसंख्या वाढत असल्याने रेल्वे कोचचे रूपांतर आयसोलेशन कोचमध्ये रूपांतर करण्यात येत आहे. सोलापूर शहरात कोरोना रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नाहीत. त्यामुळे सोलापूर स्टेशनवर ठेवण्यात आलेले रेल्वेचे आयसोलेशन कोचचे हॉस्पिटलमध्ये रूपांतर होत आहे.

जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांनी केली पाहणीकोरोना रुग्णांसाठी रेल्वेचे आयसोलेशन कोच सुरू करण्याबाबत प्रशासन पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासंदर्भात बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर व महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त विजय खोरोटे व रेल्वेचे उपविभागीय व्यवस्थापक व्ही. के. नागर, यातायात प्रमुख संजीव अर्धापुरे यांनी बाळे रेल्वे स्टेशनची पाहणी करून सोलापूर रेल्वेस्थानकावर असलेल्या प्लॅटफार्म क्रमांक ५ वरील कोचची पाहणी केली. 

रेल्वे कोचमध्ये आयसोलेशन कोच उभारणीसंदर्भात प्राथमिक स्तरावर पाहणी केली. याचवेळी रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. आयसोलेशन कोच बाळे रेल्वेस्थानकावर उभा करण्याचा निर्णय झाला आहे. त्याबाबत बाळेस्थानकाचा पाहणी दौरा जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांसमवेत झाला.  लवकरच याबाबतचा अहवाल तयार करण्यात येणार आहे. - विजय खोराटे, अतिरिक्त आयुक्त, सोलापूर महापालिका

या असतील सेवासुविधा...

  •  रुग्णांना रेल्वेकडून ‘या’ सुविधा -मध्य रेल्वेकडून सोलापूर रेल्वे स्थानकावर २२ आयसोलेश कोच उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
  •  प्रत्येक कोचमध्ये १४ याप्रमाणे ३०८ खाटांची सुविधा होणार आहे. 
  •  सोलापूरमधील हॉस्पिटल्सवरील भार होणार कमी
  •  प्रत्येक कोविड रुग्णांसाठी एक बेड रोल, उशी, नॅपकिन कचऱ्याचा डबा देण्यात येणार आहे. 
  •  विशेष म्हणजे उन्हाळा असल्याने रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून एका डब्यात नऊ कुलरची व्यवस्था करण्यात येणार आहे. 
  •  रेल्वेच्या डब्यावर पोते अंथरण्यात येणार आहे. एका डब्यात दोन ऑक्सिजन सिलिंडर असणार आहे.

 

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वेhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्या