शहरं
Join us  
Trending Stories
1
चौदा गावांचा भुर्दंड कदापि सहन करणार नाही, शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईकांचा विरोध कायम
2
वक्फबाबत सुप्रीम कोर्टाचे अंतरिम आदेश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
'विशाल गवळीच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करा', आई इंदिरा गवळीची याचिका दाखल करणार
4
Cidco Lottery 2025: अक्षय तृतीयेला सिडको आणणार १२ हजार घरे?
5
आता दुकानदारांनाही मिळणार पेन्शन? योजना या वर्ष अखेरीस सुरू होण्याची शक्यता
6
मुंबईचा फलंदाज बाद झाला, माघारी परतत असतानाच तिसऱ्या पंचांना दिसली यष्टीरक्षकाची घोडचूक, मग...
7
ठाणे: पट्टे, रॉड अन् बांबूने लहानग्यांना मारहाण, बालआश्रमातील वास्तव; ४ मुलींवर झाले अत्याचार
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२५: धन व कीर्ती यांची हानी संभवते
9
'टी. एन. शेषन यांनी मागितले होते गृहमंत्रिपद', माजी राज्यपालांच्या पुस्तकात खळबळजनक दावा
10
ठाण्यातील १,३०० झाडांवर कुऱ्हाड चालविण्याचा विकासकाचा ‘डाव’, वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड
11
"इंडस्ट्रीतील प्रत्येक महिलेसोबत त्याचे शरीरसंबंध...", अमृता रावची बहीण प्रीतिकाचे टीव्ही अभिनेत्यावर गंभीर आरोप
12
समृद्धी महामार्गावरून मेपासून जा सुसाट; मुंबई ते नागपूर केवळ आठ तासांचा प्रवास
13
मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक
14
विशेष लेख : बाळासाहेब ठाकरे नाशिकहून ‘लाइव्ह’..., आपल्या नेत्यांचे विचारच बदलायचे?
15
मुंबईतील ३६ विधानसभांसाठी भाजपचे १०८ मंडल अध्यक्ष, कोअर कमिटीच्या बैठकीत आज होणार शिक्कामोर्तब
16
वक्फ मालमत्तांचा दर्जा ५ मेपर्यंत रद्द होणार नाही; केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयाला हमी
17
अग्रलेख: तुही भाषा कंची? अशी सक्ती करायचे कारण नाही
18
शेअर बाजाराचा चौकार, ६.३७ टक्क्यांनी वाढला सेन्सेक्स; सलग चौथ्या दिवशी बाजारात वाढ
19
चार मुलींचा स्कूल बसमध्ये लैंगिक छळ, स्कूल बसच्या क्लिनरविरोधात गुन्हा दाखल
20
"न्यायालये राष्ट्रपतींना कालमर्यादा आखून देऊ शकत नाहीत; ‘सुपर पार्लमेंट’सारखे वागू नये"

भयंकर! व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल, IPS असल्याचं सांगून डिजिटल अरेस्ट अन् २७ लाख उकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 15:59 IST

दोघांना गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून अटक केली आहे.

Solapur Crime : सोलापूर शहरातील एका 'एमआर'ला (मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह) डिजिटल अरेस्ट करून त्याच्याकडून २७ लाख १० हजार रूपये ट्रान्स्फर्म करण्यास सांगून आर्थिक फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दोघांना गुजरात राज्यातील अहमदाबाद येथून अटक केली आहे.

धवलभाई विपूरभाई शहा आणि हार्दिक रोहितभाई शहा (दोघे रा. अहमदाबाद राज्य-गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे आहेत. 'एमआर' घरी असताना त्यांना ८ नोव्हेंबर २०२४ रोजी ऑडिओ व व्हिडिओ कॉल आला. कॉल करणाऱ्यांनी त्यांना स्वतःला आयपीएस अधिकारी व सीबीआय अधिकारी बोलतो असे सांगितले. तुमच्या नावाचे एक सीमकार्ड असून ते तुमच्या नावावर आहे. त्यावरून व्हॉटस अॅपद्वारे आक्षेपार्ह मेसेज व्हायरल झालेले आहेत. याबाबत कुलाबा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे, तुम्हाला आमच्याकडून डिजीटल अॅरेस्ट झाली आहे, असे सांगितले.

याबाबत कोणाशी चर्चा करायची नाही असे सांगून अॅरेस्ट वॉरंट, सुप्रिम कोर्टाची नोटीस सर्व्हेलन्सचे ३ पानी इंग्रजीमध्ये नियम असलेली नोटीस व्हॉटस अॅपवर पाठवून दिली. आम्हाला विचारल्याशिवाय तुम्हाला कुठेही बाहेर जाता येणार नाही. तुमचा कॅमेरा सतत चालू राहिला पाहिजे असे सांगितले. आयपीएस आधिकारी असल्याचे सांगून विजय खन्ना नावाच्या व्यक्तीने 'एमआर' ची चौकशी केली. 'एमआर' यांना कॅनरा बँकेतील तुमच्या खात्यामधून रक्कम ट्रान्फर मनी लाँड्रिंगमध्ये झालेली आहे. तपास कामात सहकार्य करा म्हणून तुमची रक्कम नोटरी करून आम्हाला जमा करा. तपास पूर्ण झाल्यावर तुम्हाला ४८ तासांत परत करू, असे सांगून २७ लाख १० हजार रूपये ट्रान्फर करण्यास सांगितले व आर्थिक फसवणूक केली.

बंगळुरूमध्ये एकाला झाली होती अटकडिजिटल अॅरेस्ट करून फसवणूक प्रकरणी यातील एकाला बंगळुरू (कर्नाटक) येथे अटक झाली होती, त्यानंतर त्याचा जामीनही झाला. त्याची माहिती सोलापूरच्या सायबर सेलला मिळाली. तपास करीत त्याला अहमदाबाद येथे जाऊन अटक केली, सोबत आणखी एकाला अटक केली, अशी माहिती पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी दिली.

अन्य तीन आरोपी दुबईला पळालेया प्रकरणातील अन्य तीन आरोपी निष्पन्न झाले आहेत, त्यांची माहिती घेतली असता ते दुबई येथे परागंदा झाल्याचे समजते. लवकरच त्यांना अटक केले जाईल, असे सायबर सेलच्या वतीने सांगण्यात आले 

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम