उत्कृष्ट घरकुल लाभार्थ्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:26 IST2021-08-22T04:26:45+5:302021-08-22T04:26:45+5:30

यावेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश धोत्रे, राजेश देशपांडे, सहायक लेखाधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, जिलानी अन्सारी, गृहनिर्माण ...

Honors to the best household beneficiaries | उत्कृष्ट घरकुल लाभार्थ्यांचा सन्मान

उत्कृष्ट घरकुल लाभार्थ्यांचा सन्मान

यावेळी कनिष्ठ प्रशासन अधिकारी नागेश धोत्रे, राजेश देशपांडे, सहायक लेखाधिकारी संजय पाटील, विस्तार अधिकारी अमोल तोडकरी, जिलानी अन्सारी, गृहनिर्माण अभियंता रिता सुरवसे, निंगप्पा बिदरगुंडी उपस्थित होते.

सरपंच व ग्रामसेवकांनी सत्कार स्वीकारला. प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम क्रमांक बीबीदारफळ, द्वितीय क्रमांक पडसाळी, तृतीय क्रमांक कवठे, रमाई आवास योजनेत प्रथम पाकणी, द्वितीय एकरुख- तरटगाव, तृतीय तळेहिप्परगा. प्रधानमंत्री उत्कृष्ट घरकुल बांधकाम केलेले लाभार्थी प्रथम नामदेव चव्हाण तळेहिपरगा, द्वितीय पारूबाई राठोड कवठे, तृतीय रामहरी नाईक कळमण. रमाई आवास योजनेत लाभार्थी प्रथम मुक्ताबाई हब्बू भोगाव, द्वितीय गणपत साबळे पाकणी, तृतीय उद्धव साळवे तेलगाव.

---

फोटो- उत्तर तालुक्यात घरकुलांचे उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामपंचायती व लाभार्थ्यांच्या सत्कारानंतर सभापती रजनी भडकुंबे, उपसभापती जितेंद्र शिलवंत, बीडीओ डाॅ. प्रशांत देशमुख, रिता सुरवसे, जिलानी अन्सारी, नागेश धोत्रे, संजय पाटील आदी.

Web Title: Honors to the best household beneficiaries