प्रसुत मातांचा जिजाऊ जयंतीनिमित्त सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:57 IST2021-01-13T04:57:19+5:302021-01-13T04:57:19+5:30

करमाळा : नुकत्याच प्रसुती झालेल्या मातांचा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आई सेवाभावी संस्था व नागेश चेंडगे मित्रमंडळाच्या वतीने पोषण ...

Honor on the occasion of the birth anniversary of the mother | प्रसुत मातांचा जिजाऊ जयंतीनिमित्त सन्मान

प्रसुत मातांचा जिजाऊ जयंतीनिमित्त सन्मान

करमाळा : नुकत्याच प्रसुती झालेल्या मातांचा राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त आई सेवाभावी संस्था व नागेश चेंडगे मित्रमंडळाच्या वतीने पोषण आहाराची शिधा देऊन सन्मान करण्यात आला.

करमाळा कुटीर रुग्णालय व इतर खासगी रुग्णालयात या प्रसूत मातांना गरा, साखर, तूप, खारीक, खोबरं व संक्रांतीचे तीळगुळ अशा प्रकारे दहा किलोची शिधा देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, प्रा. अशोक नरसाळे, दिनेश मडके, सूरज इंदुरे, चांदगुडे, नीलेश चव्हाण, मारुती भोसले, लक्ष्मण भोसले आदी पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. अमोल डुकरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

यावेळी नागेश चेंडगे यांचा डॉ. अमोल डुकरे यांच्या हस्ते सत्कार झाला.

----

फोटो : १२ करमाळा

माॅ जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कुटीर रुग्णालयात प्रसुती माता यांचा परिचारिका व नागेश चेंडगे यांच्या हस्ते शिधा देऊन सन्मान करण्यात आला.

Web Title: Honor on the occasion of the birth anniversary of the mother