कलावंतांकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:55+5:302020-12-30T04:29:55+5:30

बार्शीत कलाकारांचा मेळा बार्शी: सांस्कृतिक उपक्रमामुळे बार्शीकरांच्या मनोरंजनासह स्थानिक कलाकारांचा उत्साह वाढीस लागला आहे. नवनवीन कलाकार निर्माण होण्यासाठी मदत ...

Honor of Kovid warriors from artists is commendable | कलावंतांकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान कौतुकास्पद

कलावंतांकडून कोविड योद्ध्यांचा सन्मान कौतुकास्पद

बार्शीत कलाकारांचा मेळा

बार्शी: सांस्कृतिक उपक्रमामुळे बार्शीकरांच्या मनोरंजनासह स्थानिक कलाकारांचा उत्साह वाढीस लागला आहे. नवनवीन कलाकार निर्माण होण्यासाठी मदत झाली आहे. याबरोबरच महामारीच्या परिस्थितीत सामाजिक भान ठेवून कलाकारांकडून कोरोना योद्ध्यांचा होणारा सन्मान कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन ॲड. आसिफ तांबोळी यांनी केले.

ए संघराज मुव्हीज यांच्या वतीने आयोजित केलेल्या सिने व नाट्यकलावंतांचा मेळावा, कलाजागर आणि कोविड योद्ध्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. रविवारी स्व.यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक भवन येथे हा उपक्रम पार पडला. यावेळी बाजार समितीचे सभापती रणीवर राऊत, सिने कलाकार रंगा शेठ, काळूराम ढोबळे, आयोजक अश्वकुमार अहिरे, शंकर वाघमारे, सचिन वायकुळे, दत्ता दळवी, गरुडा गुळीक, शांता चौधरी, तृप्ती नाईक, वैष्णवी जगताप, स्नेहल जानराव, प्रीती बांगर, प्रशांत बोगम, स्वानंद देव, कष्णा भिंगारे, कुणाल देशमुख, अनिल भोसले आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्थानिक कलाकारांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. लोककलावंतांच्या कलाजागर कार्यक्रमात वासुदेवाची वाणी, आराधी जागर, खंडोबा गोंधळ, भारुड, लावणी, मराठी व हिंदी गीत गायन, नृत्य, विविध विनोदी लघु नाटिका, विनोदी नाटक जस्ट गंमत अशा भरगच्च कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. कोविड योद्ध्याच्या सन्मान सोहळ्यात पोलीस कर्मचारी, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा, पेट्रोल पंप कर्मचारी, शासकीय कर्मचारी, अन्नधान्य वितरणप्रणाली, पत्रकार आदींना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. आनंद खुडे व जगदीश चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अश्वकुमार अहिरे यांनी आभार मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांबळे, शरणू जवळगी, नागनाथ अडसूळ, गणेश कदम, रवींद्र चकोर, संघराज अहिरे, तात्या चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

----

Web Title: Honor of Kovid warriors from artists is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.