शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

गृहमंत्री अनिल देशमुख सोलापूर दौºयावर; जाणून घ्या संपूर्ण दौºयाबाबतचा तपशील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:42 IST

कोरोनासंदर्भातील घेणार आढावा; आषाढी यात्रेच्या अनुषंगाने पूर्वतयारीबाबतची घेणार माहिती

ठळक मुद्दे- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सोलापूर जिल्हा दौºयावर- कोरोना व आषाढी यात्रेच्या अनुषंगाने घेणार आढावा बैठक- पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसराची करणार पाहणी

सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील वाढत्या कोरोना संदर्भातील आढावा घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे उद्या शुक्रवार २६ जून २०२० रोजी सोलापूर दौºयावर येणार आहेत.

दरम्यान, शुक्रवार २६ जून २०२० रोजी सकाळी ८ वाजता गृहमंत्री अनिल देशमुख हे पुणे येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण करतील. ११ वाजता शासकीय विश्रामगृह, सोलापूर येथे आगमन, त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा होणार आहे. ११़३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सोलापूर येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उदभवलेली परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच आषाढी एकादशीनिमित्त पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास सोलापूर येथुन मोटारीने पंढरपूरकडे  रवाना होणार आहेत.

सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर येथे श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसराची पाहणी करून सायंकाळी ६ वाजता पंढरपूर येथून मोटारीने सांगोला येथे आगमन होणार आहे़ जवळा (ता. सांगोला) येथे माजी आमदार दिपक साळुंखे-पाटील यांच्या निवासस्थानी मुक्काम करून शनिवार २७ जून २०२० रोजी सकाळी आठ वाजता सांगोलामार्गे सांगलीकडे रवाना होणार आहेत. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दौºयामुळे सोलापूर जिल्हा प्रशासन, सोलापूर शहर पोलीस, ग्रामीण पोलीस दलाच्यावतीने योग्य ती तयारी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याAnil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिस