शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

बरे झाले गृहमंत्री अमितभाई येऊन गेले, सोफासेट तर सोडाच दरवाजेही बदलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2019 12:38 IST

शासकीय विश्रामधाम : २० लाख खर्चून रस्ते, जुन्या इमारतीला केली रंगरंगोटी

ठळक मुद्देशासकीय विश्रामधाममधील जुन्या इमारतींची अवस्था वाईट झाली होती इमारतीबरोबर आत असलेल्या कक्षाचा रंग निघून गेला होताबरे झाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापूरला येऊन गेले, शासकीय विश्रामधाममधील जुन्या इमारतींचे भाग्य उजळले

राजकुमार सारोळे

सोलापूर : बरे झाले, केंद्रीय गृहमंत्री अमित शहासोलापूरला येऊन गेले, शासकीय विश्रामधाममधील जुन्या इमारतींचे भाग्य उजळले. या कक्षातील सोफासेट तर सोडा दरवाजेही बदलण्यात आले आहेत. 

शासकीय विश्रामधाममधील जुन्या इमारतींची अवस्था वाईट झाली होती. इमारतीबरोबर आत असलेल्या कक्षाचा रंग निघून गेला होता. आत पाहुण्यांसाठी ठेवण्यात आलेले सोफासेट तुटलेले, गाद्या फाटलेल्या, मळक्या उषा, बेडसीट, चादरची अवस्था तर विचारायला नको अशी होती. 

खिडक्यांचे पडदे फाटून गेलेले. बाथरुमची दुरवस्था, वातानुकूलित यंत्रणा नुसती शोभेलाच दिसत होती. जुन्या दगडी इमारतीतील भोगावती, बोरी या कक्षांची अवस्था तर अत्यंत बिकट होती. आलेले व्हीआयपी या कक्षाऐवजी पुष्कराजमधील कक्षाची मागणी करीत होते. पण पुष्कराजमधील कक्ष पालकमंत्री, सहकारमंत्री यांच्या नावे राखीव असल्याने नाईलाजाने पाहुण्यांना निशिगंध या कक्षांचा आधार घ्यावा लागत होता. 

रात्री आलेले पाहुणे चादर, बेडसीट, तुटलेल्या सोफासेटबद्दल तक्रार केल्यावर कर्मचारी आम्ही काय करणार इथे अशीच अवस्था आहे, असे उत्तर द्यायचे. निधीची तरतूद होत नसल्याच्या अडचणी सांगितल्या जात होत्या. महाजनादेश यात्रेच्या समारोपनिमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुक्कामाला येणार म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासकीय विश्रामधामचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले. 

मुख्य प्रवेशद्वार ते दगडी इमारतीपर्यंत डांबरीकरण करण्यात आले. नवीन पुष्कराज इमारतीतील सर्व कक्षाचे पडदे बदलण्यात आले व इतर साफसफाई करण्यात आली. समोर कौलारू इमारतीची रंगरंगोटी करण्यात आली.

या इमारतीतील सर्व कक्षाचे दरवाजे बदलण्यात आले. इतकेच काय आतील जुने सोफासेट काढून टाकण्यात आले. कक्षाला नवीन रंग, स्वच्छतागृहाची दुरुस्ती करण्यात आली. खिडक्यांचे पडदे, गाद्या, बेडसीट, चादरी बदलण्यात आल्या. वातानुकूलित यंत्रणाही दुरुस्त करण्यात आली आहे. दगडी इमारतीतील भोगावती व बोरी कक्षातील जुन्या वस्तू बदलण्यात आल्या. या दौºयामुळे तीन इमारतींचे भाग्य उजळले आहे. आणखी चार इमारती दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

सात वर्षांनंतर नूतनीकरण- कौलारू व दगडी इमारतीतील कक्षांची दुरवस्था झाली होती. सात वर्षांपासून दुरुस्ती व देखभाल होत नव्हती. पंढरपुरात अखिल भारतीय नाट्य संमेलन झाले, त्यावेळी राज्यभरातून पाहुणे येणार असल्याने रंगरंगोटी झाली होती, असे सांगण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपासून दुरुस्तीबाबत पाठपुरावा सुरू होता. विश्रामगृहात मुक्कामासाठी येणारे पाहुणे दुरवस्था पाहून नाराजी व्यक्त करीत होते. 

धार्मिक पर्यटन व इतर कामानिमित्त राज्यभरातून लोकांची वर्दळ आहे. त्या मानाने सुट चांगले नाहीत, अशा वारंवार तक्रारी होत्या. व्हीआयपींच्या दौºयामुळे महत्त्वाच्या सुटची डागडुजी करण्यासाठी सुमारे २0 लाख खर्च केला आहे. इतर खोल्यांचीही लवकरच दुरुस्ती करण्यात येणार आहे.-संतोष शेलार, अधीक्षक अभियंता, बांधकाम विभाग

टॅग्स :SolapurसोलापूरAmit Shahअमित शहाtourismपर्यटन