शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सुटीचा मूड कायम : शाळा बंदने मुलं खेळात रमली; अभ्यास पार विसरूनही गेली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 12:47 IST

ऑनलाइन अभ्यासाची सवय लागेना

सोलापूर : कोरोना प्रादुर्भावाच्या भीतीने मागील दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याकरिता शिक्षण विभागाने सर्व शाळांनाऑनलाइन अभ्यासक्रम राबवण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर प्रत्येक शाळेकडून ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. ऑनलाइन अभ्यासाची सवय अद्याप चिमुकल्यांना झालेली नाही. शाळा बंद असल्याने मुलं खेळात रमली. मात्र, सुटीचा मूड कायम असल्याने अभ्यासही विसरून गेली आहेत.

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अशात प्राथमिक शाळा सुरू करायच्या की नाही याबाबत सरकारही मौन बाळगून आहे. सध्यातरी माध्यमिक शाळा सुरू करण्याच्या हालचाली आहेत. भविष्यात जर प्राथमिक शाळा सुरू झाल्या तर विद्यार्थ्यांचा मूड अद्याप शाळेत जाण्याचा नाही. चिमुकल्यांचा सुटीचा मूड कायम असून, अभ्यासक्रमाचा विसर पडत चालल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत. पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांची संख्या जवळपास पावणेतीन लाख आहे.

वर्गनिहाय विद्यार्थी

  • पहिली-७०,६०६
  • दुसरी-७६,१६७
  • तिसरी-७६,०९८
  • चौथी-७७,३११

 

सरकार शाळा सुरू करण्याच्या विचारात आहे. माध्यमिक शाळा सुरू होत आहेत म्हटल्यावर आम्ही मुलांना तुमच्याही शाळा सुरू होत आहेत असे सांगितल्यानंतर मुलं गप्प राहतायत, प्रत्युत्तर देईनात. निरुत्साह दाखवत आहेत.

- राजाराम शिंदे,

कोरोना असल्यामुळे मुलांनी दीड वर्षापासून ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण केला. प्रत्यक्षात मुलांची अभ्यास करण्याची सवय मोडली. पुन्हा शाळा सुरू झाल्यानंतर शाळेला जाणार नाही, असे मुलं हट्ट करतायेत. अद्याप त्यांच्या मनात सुटीचा मूड कायम आहे.

- राजेंद्र साडे

अभ्यासक्रम टाळण्यासाठी ही आहेत कारणे

शाळा बंद असल्यामुळे मुलांचा एकाग्रपणा कमी झाला आहे. टीव्ही बघण्याचे प्रमाण वाढले. अभ्यासक्रमाला बसा असे जेव्हा पालक सांगतात तेव्हा मुलं विविध कारणे सांगतात. मन लागेना. अभ्यासक्रम लक्षात येईना. समजेना. यासह विविध प्रश्‍नांचा भडिमार पालकांवर होतोय. त्यामुळे पालक देखील मुलांच्या अभ्यासक्रमाला कंटाळले.

प्रेमानं बोलून सवयी पूर्ववत करा...

जोपर्यंत प्राथमिक शाळा सुरू होत नाहीत तोपर्यंत पहिली ते सातवीपर्यंत विद्यार्थ्यांची शाळा हे घरच राहणार आहे. त्यामुळे पालकांची जबाबदारी वाढली आहे. पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष देऊन त्यांचे मनोबल वाढवावे. त्यांचा उत्साह वाढवावा. त्यांच्याशी गोडीगुलाबीने बोलून अभ्यासक्रम पूर्ण करून घ्यावा. विविध छंद जोपासण्यासाठी त्यांना प्रोत्साहन करा. प्रेमाने बोलून त्यांच्या सवयी पूर्ववत करून घ्याव्यात.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाonlineऑनलाइन