शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट तालुक्यात मुसळधार पाऊस; गावागावात शिरले पाणी, अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 16:32 IST

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला दिल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यात बुधवारी दुपारच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. या अचानक पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढे, तलाव, नाल्यांना पाणी आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. शिवाय अनेक गावात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, अक्कलकोट तालुक्यातील बोरगांव पुलावरून पाणी जोरात वाहू लागले आहे. बोरगांव-घोळसगांव चा संपर्क तुटला आहे.  अक्कलकोट तालुक्यातील किणीवाडी पालापुर पुल पाण्याखाली गेला आहे. कुरनूर धरणातून सद्यस्थितीमध्ये ६०० क्युसेकने प्रवाह सोडण्यात आलेला आहे.

नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला दिल्याची माहिती तहसिलदार बाळासाहेब शिरसाट यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यात सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. शिवाय सोलापुरात दुपारनंतर पावसाच्या सरी कोसळल्या. अनेक भागात पाऊस पडत आहे. मागील काही दिवसांपूर्वी अक्कलकोट तालुक्यात मोठा पाऊस पडला होता. तेव्हाही अनेक गावांचा संपर्क तुटला होता. तहसिल प्रशासनाने नुकसानग्रस्त भाग व कुरनूर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागणसूर येथे चार ओढे आहेत. मुसळधार पावसात नागणसूर येथील चारही ओढे फुल भरून वाहू लागले. चारही ओढ्यांवरील पुलावरून पाणी वाहत राहिले. यापैकी भासगी ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक थांबली आणि नागणसूरचा संपर्क तुटला. सात तास गावचा संपर्क तुटला होता.नागणसूर पुलाकडेचा भराव वाहून

अक्कलकोट-नागणसूर राष्ट्रीय महामार्गावर भासगी ओढ्याच्या पुलावर दिवसभर पाणी राहिल्याने भराव वाहवून गेला. त्यामुळे या पुलावर दोन ठिकाणी मोठे खड्डे पडून दोन ठिकाणी रस्ता खचला आहे. येथे धोकादायक स्थितीत वाहतूक सुरू असून, याची माहिती मिळताच बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदाराने त्या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली. पाणी ओसरताच लवकरात लवकर पुन्हा भराव टाकून रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला दिल्या. कर्नाटकमध्ये धावणारी वाहने ठप्प

मार्गावरून अक्कलकोटहून धावणारी बरीच वाहने ही कर्नाटक राज्यात जातात. तीर्थक्षेत्र हैद्रा येथे ख्वाजा दर्गा असून, येथे अमावास्या, पौर्णिमा आणि विविध सण, उत्सवादरम्यान भाविकांची दर्शनासाठी याच पुलावरील रस्त्यावरून वर्दळ असते. तोळनूर, अक्कलकोट स्टेशन, कर्नाटकातील माशाळ, करजगी, अफझलपूर, उडचण, मनूर, शिंदगी, विजापूर अशा अनेक गावांना हा रस्ता जोडतो. येथून वाहतूक ठप्प झाली आहे. हा रस्ता धोकादायक बनला असून, रात्रीच्या वेळी एखादा वाहनस्वार, पादचारी या खड्ड्यात पडून दुर्घटना घडू शकते.

टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूरakkalkot-acअक्कलकोट