शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ह्रदयद्रावक : कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनानंतर पत्नीची सोलापुरात रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2021 11:02 IST

मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर येथील कोरे कुटुंबाचा करुण अंत : चिमुकला पोरका

मंगळवेढा : कोरोना पॉझिटिव्ह पतीच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने व पतीच्या निधनानंतर संसार कसा चालवायचा, या विवंचनेत सापडलेल्या पत्नीने रेल्वेखाली  आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज बुधवारी सकाळी  घडली आहे.

बुधवारी पहाटे पतीचे निधन झाले आणि काही तासाच्या आत पत्नीने  रेल्वेखाली  आपली जीवनयात्रा संपवली.  पती पत्नीचा करूण अंत झाला असून या  ह्रदयद्रावक घटनेत सातवी इयत्तेत शिकणारा व एकुलता एक असणारा मुलगा हा पोरका झाला आहे  या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.  मंगळवेढा तालुक्यातील शरदनगर येथील आप्पासाहेब रावसाहेब कोरे ( वय ३९) हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने सोलापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते त्यांचे ऑक्सिजन लेवल कमी झाल्याने त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले होते त्यांना गेल्या दोन दिवसांपासून जास्त त्रास जाणवत होता अखेर उपचारादरम्यान त्यांचे बुधवारी पहाटे निधन झाले.

दरम्यान पतीच्या सेवेसाठी सोलापूर येथे दवाखान्यात असणाऱ्या त्यांच्या पत्नी प्रियांका यांना पतीच्या निधनाची बातमी समजताच त्यांना मोठा धक्का बसला त्यांनी थेट रेल्वेखाली पडून  आत्महत्या केली

................................आई वडिलांचा करूण अंत : मुलगा पोरका....शरदनगर येथील आप्पासाहेब कोरे हे गॅस पाईपलाईन मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होते . पत्नी ही मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होती मोलमजुरी करून हे कुटुंब आपला उदरनिर्वाह करीत असे. या कुटुंबाला रोजच्या जगण्याचा संघर्ष करावा लागायचा. त्यातच लॉकडाऊनचे  संसार कसा चालवायचा, असा प्रश्न या कुटुंबीयांपुढे होता. रोजच्या संघर्षात घरातल्या कर्त्या पुरुषालाच कोरोनाने घेरले. पती पॉझिटिव्ह आल्यानंतर ते सोलापूर येथील हॉस्पिटलमध्ये  दाखल झालले, १०  दिवसांच्या उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी पत्नीला कळताच तिने सोलापूर येथे रेल्वेखाली आत्महत्या केली . या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

--------------कर्त्या पुरुषाच्या निधनानंतर संसार उघड्यावर--कोरोना महामारीने अजूनही  दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे. घरातील कर्त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या पश्चात असलेल्या कुटुंबाने जगावे कसे, याची धास्ती अनेकांना लागली आहे. या विवंचनेतून शरदनगर येथील  एका पत्नीने  आपली जीवनयात्रा संपवली.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेCrime Newsगुन्हेगारी