आरोग्य मंत्र्यांचे बेताल वक्तव्य; उत्तर तालुक्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिकात्मक फोटोला मारले जोडे

By Appasaheb.patil | Updated: March 30, 2023 16:55 IST2023-03-30T16:53:37+5:302023-03-30T16:55:31+5:30

शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडोमारो आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.

Health Minister's Absurd Statement; Shiv Sainiks of the Thackeray group in Uttar taluka | आरोग्य मंत्र्यांचे बेताल वक्तव्य; उत्तर तालुक्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिकात्मक फोटोला मारले जोडे

आरोग्य मंत्र्यांचे बेताल वक्तव्य; उत्तर तालुक्यातील ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी प्रतिकात्मक फोटोला मारले जोडे

सोलापूर : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात उत्तर सोलापूर तालुका शिवसेना वतीने  तालुकाप्रमुख संजय पौळ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथे आंदोलन करण्यात आले.

शिवसैनिकांचे दैवत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल वारंवार चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात जोडोमारो आंदोलन करून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच अशाप्रकारचे वक्तव्य शिवसैनिकांकडून कदापि खपवून घेतले जाणार नाही. असा इशाराही शिवसेनेच्या वतीने दिला.

यावेळी तालुका प्रमुख संजय पौळ, शिवसेना उपतालुकाप्रमुख सचिन घोडके, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष नितीन भोसले, माजी सभापती धनंजय लामकाने, विभाग प्रमुख हरिदास कुंभार, महेश साठे कारंबा गावचे उपसरपंच ज्ञानेश्वर जगताप, उपविभाग प्रमुख सतिश गरड, नागनाथ गुत्ती ,शाखाप्रमुख  उपविभाग प्रमुख अरुण लोंढे, अकोलेकाटीचे उपसरपंच राजेंद्र घाटे,  प्रसिध्दी प्रमुख प्रशांत चव्हाण,  शाखाप्रमुख प्रमोद गवळी यांसह आदी तालुक्यांतील शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Web Title: Health Minister's Absurd Statement; Shiv Sainiks of the Thackeray group in Uttar taluka