सोलापुरात बालाजी मंदिराजवळ आढळला तो बेशुद्ध; डॉक्टरांनी केले मृत घोषित
By विलास जळकोटकर | Updated: June 7, 2023 18:53 IST2023-06-07T18:53:17+5:302023-06-07T18:53:50+5:30
शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासले असता तो उपचारापूर्वची मृत्यू पावल्याचे घोषित केले.

सोलापुरात बालाजी मंदिराजवळ आढळला तो बेशुद्ध; डॉक्टरांनी केले मृत घोषित
सोलापूर: शहरातील पूर्व भागात असलेल्या बालाजी मंदिरासमोरील लिंबाच्या झाडाखाली श्रीनिवास सिद्राम कोरे (वय- ५५, रा. जुना विडी घरकूल, समाधान नगर, सोलापूर) हा व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळला. बुधवारी (७ जून) ही घटना उघडकीस आली. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तपासले असता तो उपचारापूर्वची मृत्यू पावल्याचे घोषित केले.
पूर्व भागातील बालाजी मंदिरासमोरील झाडाखाली गुरुवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास श्रीनिवास हे बेशुध्दावस्थेत आढळून आले होते. सकाळी १०: ३० वाजता पोलीस हवालदार खुने यांनी उपचारास दाखल केले होते. या घटनेची नोंद सिव्हील पोलीस चौकीत झाली आहे.