बहिणीला आणायला गेलेल्या दोन भावांवर चाकूने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:23 IST2021-05-07T04:23:12+5:302021-05-07T04:23:12+5:30

वाढेगाव (ता. सांगोला) येथील प्रमोद भागवत पवार व प्रशांत भागवत पवार हे दोघे ४ मे रोजी (एमएच ४५/ एडी ...

He stabbed two brothers who had gone to fetch his sister | बहिणीला आणायला गेलेल्या दोन भावांवर चाकूने वार

बहिणीला आणायला गेलेल्या दोन भावांवर चाकूने वार

वाढेगाव (ता. सांगोला) येथील प्रमोद भागवत पवार व प्रशांत भागवत पवार हे दोघे ४ मे रोजी (एमएच ४५/ एडी ९५०७) चारचाकी गाडी भाड्याने करून बहीण प्रियांका हिस आणण्यासाठी तिच्या सासरी खानापूर-बलवडी (ता. विटा, जि. सांगली) येथे गेले होते. रात्री ९.३० वाजेच्या सुमारास बहीण व तिच्या मुलांना घेऊन येत असताना दाजी गजेंद्र गायकवाड यांनी तू मुलांना घेऊन जायचे नाही, असे म्हणून पत्नी प्रियांका हिस मारहाण केली.

भाऊ प्रमोद व प्रशांत हे दोघे सोडविण्यास मध्ये गेले असता दोघांनाही गजेंद्र गायकवाड व त्याचा भाऊ सिध्देश्वर गायकवाड यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने पोटाजवळ वार करून गंभीर जखमी करून पळून गेले. याबाबत प्रमोद पवार यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी गजेंद्र गायकवाड, सिध्देश्वर गायकवाडसह दोन अनोळखीविरुद्ध गुन्हा नोंदला आहे.

Web Title: He stabbed two brothers who had gone to fetch his sister