दुकानाशेजारी झोपले अन् घरातील दागिने चोरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:07+5:302021-03-26T04:22:07+5:30

भातंबरे येथील संजय सोनार हे नेहमीप्रमाणे किराना दुकान बंद करून जेवण झाल्यानंतर कुटुंबासह दुकानाच्या शेजारी झोपले होते. दरम्यान मध्यरात्री ...

He slept next to the shop and stole jewelery from the house | दुकानाशेजारी झोपले अन् घरातील दागिने चोरले

दुकानाशेजारी झोपले अन् घरातील दागिने चोरले

भातंबरे येथील संजय सोनार हे नेहमीप्रमाणे किराना दुकान बंद करून जेवण झाल्यानंतर कुटुंबासह दुकानाच्या शेजारी झोपले होते. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्याने दुकानाचे बाहेरून लावलेली कडी व कुलूप तोडून घरात प्रवेश केला. तेथी कपाट उघडून त्यातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ९२ हजारांचे ऐवज चोरून नेला. ही घटना पत्नी सुमित्रा सोनार या गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उठल्यावर दुकानाचे कुलूप तोडलेले तसेच घरातील कपडे विस्कटलेले दिसले. त्यांनी आसपास कोठे चोरटे आहेत का ते पाहिले. त्यानंतर घडलेली घटना शेजाऱ्यांना सांगितली. रणजीत वाघमोडे हे देखील बाहेर झोपले होते. चोरट्यांनी यांच्याही मोबाईलची चोरी केली.

याबाबतची फिर्याद संजय सोनार यांनी वैराग पोलिसात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड हे करीत आहेत.

Web Title: He slept next to the shop and stole jewelery from the house