"सिंचनाची स्वप्ने त्यांनी दाखवली, पूर्ण आम्ही करणार", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार, मोहिते पाटलांना टोला
By राकेश कदम | Updated: April 16, 2024 15:52 IST2024-04-16T15:45:57+5:302024-04-16T15:52:57+5:30
Lok Sabha Election 2024 : सोलापुरातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.

"सिंचनाची स्वप्ने त्यांनी दाखवली, पूर्ण आम्ही करणार", देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार, मोहिते पाटलांना टोला
सोलापूर : सोलापूर आणि माढ्यासाठी काही नेते नुकतेच एकत्र आले. या नेत्यांनी सोलापूर जिल्ह्यात सिंचनाची स्वप्ने दाखवली. पण हे स्वप्ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही पूर्ण करणार, असा टोला भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते-पाटील यांना लगावला.
सोलापुरातील भाजपाचे उमेदवार राम सातपुते आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निंबाळकर यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा कार्यकर्त्यांची रॅली काढण्यात आली. या रॅलीच्या समोर कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौक मार्गे चार हुतात्मा चौक मार्गावर ही रॅली काढण्यात आली.
महायुतीचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. आमदार राम सातपुते हा गरिबा घरचा ऊस तोडणी कामगारांचा मुलगा आहे. त्यालाही हिणवू नका. त्याचा अपमान करू नका. लोकसभेची लढाई ही पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.