महागड्या वस्तूंसाठी पत्नीचा छळ; पतीसह दहा जणांवर गुन्हा

By दिपक दुपारगुडे | Updated: June 23, 2023 17:42 IST2023-06-23T17:41:57+5:302023-06-23T17:42:14+5:30

शगुफता यांचे मोहसिन अब्दुल मोईन शेख याच्याशी २०२२ मध्ये विवाह झाला.

Harassment of wife for expensive goods; Crime against ten people including husband | महागड्या वस्तूंसाठी पत्नीचा छळ; पतीसह दहा जणांवर गुन्हा

महागड्या वस्तूंसाठी पत्नीचा छळ; पतीसह दहा जणांवर गुन्हा

सोलापूर : महागडे संसार उपयोगी साहित्य व फर्निचरसाठी पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह दहा जणांवर विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शगुफ्ता माेहसिन शेख (वय २८, रा. आंबेडकर नगर, होटगी रोड) यांनी फिर्याद दिली आहे. शगुफता यांचे मोहसिन अब्दुल मोईन शेख याच्याशी २०२२ मध्ये विवाह झाला.

विवाहानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी शगुफ्ता यांना मानसिक व शारीरिक त्रास देत होते. शिवाय आईवडिलांकडून १० लाख रुपये घेऊन ये नाहीतर महागडे संसार उपयोगी साहित्य घेऊन ये म्हणत त्रास देत होते. शिवाय जीवे ठार मारण्याची धमकी देत उपाशी पोटी ठेवत होते अशा आशयाची फिर्याद शगुफता शेख यांनी दिली आहे.

या फिर्यादीवरून मोहसीन अब्दुल मोईन शेख, सासू आतेफा शेख, सासरे अब्दुल मोईन शेख (रा. गणेश नगर, परभणी), निकत कौसर तकीअहमद शेख, तकी अहमद शेख (दोघे रा. नांदेड), नुसरत कौसर इम्तियाज शेख, ईशर्रत कोसर इमराज सय्यद, मसर्रत कौसर सरफराज शेख, सरफराज अकबर शेख (रा. चंद्रकला नगर, नई जिंदगी), तलक कौसर अब्दुल मोईन शेख (रा. जालना) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनेचा तपास बिराजदार करत आहेत.

Web Title: Harassment of wife for expensive goods; Crime against ten people including husband