दहा लाखासाठी पत्नीचा छळ, पतीसह सहा जणांवर गुन्हा

By रवींद्र देशमुख | Updated: June 21, 2023 17:33 IST2023-06-21T17:32:38+5:302023-06-21T17:33:17+5:30

फिर्यादी सुकन्या यांचे आरोपी रतनकुमार याच्यासोबत २०२२ मध्ये विवाह झाला होता.

Harassment of wife for 10 lakh dowry, crime against six persons including husband | दहा लाखासाठी पत्नीचा छळ, पतीसह सहा जणांवर गुन्हा

दहा लाखासाठी पत्नीचा छळ, पतीसह सहा जणांवर गुन्हा

सोलापूर : घरात राहायचे असेल तर घर बांधण्यासाठी माहेरून १० लाख रूपये घेऊन ये म्हणत पत्नीचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर सदर बाझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत सुकन्या रतनकुमार कांबळे ( वय ३२, रा. संजय नगर, कुमठा नाका) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी सुकन्या यांचे आरोपी रतनकुमार याच्यासोबत २०२२ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर पती रतनकुमार, दीर महादेव कांबळे, उध्दव कांबळे, पतीची आत्या अंजीरा सोनकांबळे, नातेवाईक सुजाता सोनकांबळे, सतीश गायकवाड या सर्वांनी पीडितेला वारंवार मानसिक त्रास दिला. शिवाय इथे रहायचे असेल तर घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रूपये घेऊन ये म्हणत त्रास देत होते. याप्रकरणी वरील सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Harassment of wife for 10 lakh dowry, crime against six persons including husband