शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कॉन्फरन्स अर्ध्यावरच; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बोलण्याआधीच तुटला संपर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 13:22 IST

ग्रामीणमधील मृत्यूदराबाबत विभागीय आयुक्तांनी व्यक्त केली चिंता; कोरोना उपाययोजनांचा घेतला आढावा

ठळक मुद्देपुणे विभागातील स्थिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मांडलीठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतलाग्रामीणमध्ये वाढत चाललेल्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली

सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलण्याआधीच संपर्क तुटल्याने सोलापूरची कोरोना आढाव्याची बैठक अर्धवट राहिली. मात्र विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात ग्रामीणमध्ये वाढत चाललेल्या मृत्यूदराबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

ठाकरे यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनेचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून या कॉन्फरन्सला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, झेहपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अधीक्षक मनोज पाटील, शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. शीतल जाधव, सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉ. जयस्वाल आदी उपस्थित होते. 

पुणे विभागातील स्थिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी मांडली. विभागात ग्रामीणमध्ये कोरोनाचा मृत्यूदर वाढत चालल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. ग्रामीण भागातील खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन ज्येष्ठ व्यक्ती व चिंताजनक रुग्णांवर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था करणे गरजेचे असल्याची त्यांनी सूचना केली. याबाबत जिल्हाधिकाºयांनी अहवाल मांडण्याआधीच संपर्क तुटल्याने सोलापूरची चर्चा अर्धवट राहिल्याचे सांगण्यात आले. 

खासगी जागेची पाहणीया आढाव्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी उपस्थित अधिकाºयांबरोबर ग्रामीणमधील मृत्यूदर कमी करण्याबाबत चर्चा केली. सिव्हिल हॉस्पिटलकडे अन्य जिल्ह्यातून रुग्ण येत आहेत. त्याचबरोबर ग्रामीणमधील अनेक खासगी हॉस्पिटल ताब्यात घेऊन उपचाराची सोय करता येईल, असे सुचविण्यात आले. पोटफाडी चौकातील खासगी मंगल कार्यालय ताब्यात घेऊन तेथेही ग्रामीण रुग्णांसाठी कोरोना हॉस्पिटल सुरू करता येईल काय, याबाबत जिल्हाधिकाºयांनी पाहणी केली. 

मृत्यूदर कमी करा: टोपेकोरोनामुळे होणाºया  मृत्यूचा राज्याचा दर ३.३५ टक्के आहे. पण मुंबई, नंदूरबार, सोलापूर,  अकोला, लातूर, जळगाव, रत्नागिरी जिल्ह्याचा मृत्यूदर राज्याच्या सरासरीपेक्षा वाढला आहे. मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करा, अशा सूचना आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी दिल्या. 

टॅग्स :SolapurसोलापूरUddhav Thackerayउद्धव ठाकरेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस