सोलापुरात पाच लाखांच्या गुटख्याच्या साठा पकडला
By रवींद्र देशमुख | Updated: May 19, 2023 14:56 IST2023-05-19T14:55:30+5:302023-05-19T14:56:05+5:30
आरोपी कटरे याने रामलाल चौकातील वारद चाळ येथे आपल्या गोडाऊनमध्ये विविध कंपन्यांच्या गुटख्याचा साठा केला होता.

सोलापुरात पाच लाखांच्या गुटख्याच्या साठा पकडला
सोलापूर : राज्यात प्रतिबंधित असलेल्या पाच लाखांच्या गुटख्याचा साठा केल्याप्रकरणी गणेश तानाजी कटरे ( रा. त्रिकोणी चाळ, भैय्या चाैक) याच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आरोपी कटरे याने रामलाल चौकातील वारद चाळ येथे आपल्या गोडाऊनमध्ये विविध कंपन्यांच्या गुटख्याचा साठा केला होता. त्याच्याकडून सर्व गुटखा पाकिट जप्त करण्यात आले आहेत. यात एकूण ४ लाख ८८ हजार ३७ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सपोनि गायकवाड करत आहेत.