विमानसेवा नसणाºया सोलापूरकडून जगातील ७६ हजार उद्योजकांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 01:06 PM2020-05-20T13:06:31+5:302020-05-20T13:10:56+5:30

आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सोलापूरच्या अमित जैन याने दिले डिजिटल मार्केटिंगचे धडे

Guidance to 76,000 entrepreneurs from around the world from Solapur, which has no airlines | विमानसेवा नसणाºया सोलापूरकडून जगातील ७६ हजार उद्योजकांना मार्गदर्शन

विमानसेवा नसणाºया सोलापूरकडून जगातील ७६ हजार उद्योजकांना मार्गदर्शन

Next
ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय सेमिनारच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा सोलापूर विमानसेवेचा प्रश्न उपस्थितसोलापुरातील उद्योजकांनी सोलापूरच्या राजकीय इच्छाशक्ती विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्यासोलापुरातील प्रसिद्ध गारमेंट उद्योजक अमित जैन यांनी या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपनी डिजिटल आॅनलाईन व्यासपीठावर मार्गदर्शन केले

सोलापूर : सोलापूरसारख्या ठिकाणी साधी विमानसेवा नाही. औद्योगिक वातावरण असलेल्या सोलापुरात उद्योजकांच्या दृष्टीने व्हीआयपी ट्रीटमेंट नाही. अशा ठिकाणी गारमेंट उद्योगात नवनवीन प्रयोग करून युवा गारमेंट उद्योजक जागतिक मार्केट काबीज करू पाहत आहेत. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून त्यांनी जगासमोर एक नवीन बाजारपेठ उपलब्ध करण्याचा प्रयत्न केलाय. यातील एका युवा उद्योजकाला तुम्ही ऐका आणि निश्चितच तुम्हाला उद्योगाभिमुख बळ मिळेल, अशा शब्दांत एका आॅनलाईन डिजिटल व्यापार करणाºया बहुचर्चित आंतरराष्ट्रीय कंपनीने जगभरातील मोठ्या उद्योजकांसमोर सोलापूरचे प्रेझेंटेशन केले. निमित्त होते एका आंतरराष्ट्रीय डिजिटल व्यापार कंपनीच्या वेबिनारचे. 

जगभरातील मोठ्या उद्योजक आणि व्यापाºयांकरिता त्या आंतरराष्ट्रीय कंपनीने एक वेबिनार आयोजिला होता. या वेबिनारमध्ये सोलापूरचे युवा गारमेंट उद्योजक अमित जैन यांनी मार्गदर्शन केले. वेबिनारच्या सुरुवातीला त्या आंतरराष्ट्रीय कंपनीने सोलापूरचे प्रेझेंटेशन विमानसेवा नसलेले औद्योगिक शहर असे केले. त्यामुळे जैन यांना काहीसे अवघडल्यासारखे वाटले. जगाच्या व्यासपीठावर आपण सोलापूरचे प्रेझेंटेशन करणार आहोत, याचा आनंद जैन यांच्या मनात असताना सोलापूरची झालेली अशी ओळख त्यांना काहीशा वेदना देणारीही ठरली. 

आंतरराष्ट्रीय सेमिनारच्या व्यासपीठावर पुन्हा एकदा सोलापूर विमानसेवेचा प्रश्न उपस्थित झाल्याने सोलापुरातील उद्योजकांनी सोलापूरच्या राजकीय इच्छाशक्ती विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून जागतिक व्यापारपेठांमध्ये शिरता येईल, असे मत जैन यांनी व्यक्त केले. सोलापुरातील प्रसिद्ध गारमेंट उद्योजक अमित जैन यांनी या विषयावर आंतरराष्ट्रीय कंपनी डिजिटल आॅनलाईन व्यासपीठावर मार्गदर्शन केले. या आॅनलाईन व्यासपीठावर जगभरातील तब्बल ७६ हजारांहून अधिक उद्योजक व्यापारी उपस्थित होते. सर्वांनी अमित जैन यांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. जैन यांनी सांगितलेल्या अचूक नियोजन आणि डिजिटल मार्केटिंग वापराचे फायदे या मुद्द्यांचे सर्वांनी स्वागत केले. 

उद्योजकांपुढील आव्हाने विषयावर मागविले होते विचार
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या आंतरराष्ट्रीय आॅनलाईन कंपनीने जगभरातील उद्योजकांना पुढील आव्हाने कशी असतील, या विषयावर विचार मागवले होते. सोलापूरचे अमित जैन यांनी सोलापुरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शनाचे प्रेझेंटेशन त्या कंपनीसमोर सादर केले. डिजिटल मार्केटिंगचा वापर करून आंतरराष्ट्रीय गारमेंट प्रदर्शन यशस्वी झाल्याचे अनुभव देखील त्यांनी कंपनीसमोर मांडले. या वेबिनारमध्ये अमित जैन हे एकूण नऊ मिनिटे बोलले. डिजिटल मार्केटिंगमधून देश आणि विदेशातील व्यापाºयांना कसे आकर्षित करता येईल, यावर अमित जैन यांनी मार्गदर्शन केले. यास मेक इन इंडियाची जोड दिली.

आंतरराष्ट्रीय वेबिनार मार्गदर्शन करण्यासाठी भारतातून फक्त दोन उद्योजकांची निवड करण्यात आली होती. सोलापुरातून अमित जैन यांनी वेबिनारद्वारे जगभरातील व्यापाºयांना अचूक मार्गदर्शन केले. ही गोष्ट सोलापूरसाठी मोठी अभिमानाची आहे. संपूर्ण भारताच्या औद्योगिक व्यासपीठावर सोलापूरच्या डिजिटल मार्केटिंगची चर्चा या वेबिनारच्या माध्यमातून झाली. जैन यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल सोलापुरातील उद्योजकांनी आनंद व्यक्त केला आहे. 

Web Title: Guidance to 76,000 entrepreneurs from around the world from Solapur, which has no airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.