शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

गुगलकडून सोलापूरातील १३ विद्यार्थ्यांना मिळाली शिष्यवृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 11:54 IST

सोलापूर : येथील वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना गुगल आणि उडसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमातील १३ यशस्वी विद्यार्थ्यांना तीन लाख ७४ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले सर्व विद्यार्थी डब्ल्यू.आय.टी.च्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील आहेत. अँड्रॉईड अँड वेब डेव्हलपमेंट स्पर्धेतील शिष्यवृत्तीपात्रांमध्ये अँड्रॉईड बिगीनर गटात ...

ठळक मुद्देशिष्यवृत्तीस पात्र ठरलेले सर्व विद्यार्थी डब्ल्यू.आय.टीतील विद्यार्थीप्रत्येकी २२ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली

सोलापूर : येथील वालचंद इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना गुगल आणि उडसिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमातील १३ यशस्वी विद्यार्थ्यांना तीन लाख ७४ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली. 

शिष्यवृत्तीस पात्र ठरलेले सर्व विद्यार्थी डब्ल्यू.आय.टी.च्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागातील आहेत. अँड्रॉईड अँड वेब डेव्हलपमेंट स्पर्धेतील शिष्यवृत्तीपात्रांमध्ये अँड्रॉईड बिगीनर गटात निमा पटेल, आकांक्षा तापडिया, अंकिता गांधी, चयन बोबरा, योगेश कल्याणशेट्टी, महेंद्र महाजन, आसिफ खान हे तृतीय वर्षातील विद्यार्थी आणि अंतिम वर्षाला असलेला रिदम जैन यांचा समावेश आहे. त्यांना प्रत्येकी २२ हजार ६०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.

वेब बिगीनर गटात प्रखर जैन (तृतीय वर्ष), संजय हिरेमठ आणि प्रज्ञा दुडम (अंतिम वर्ष) यांना प्रत्येकी २७ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली आहे. अँड्रॉईड एन्टरमिडिएट गटात श्रुती अनोदे, नवकार जैन, प्रखर मेहता जैन (अंतिम वर्ष) यांना प्रत्येकी ३७ हजार ६०० रुपयांची ष्यिवृत्ती मिळाली आहे. तृतीय आणि अंतिम वर्षाला शिकणाºया विद्यार्थ्यांच्या गुणात्मक कौशल्याला अनुसरून गुगलने घेतलेली ही परीक्षा होती. 

प्राचार्य डॉ. शशिकांत हलकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंडस्ट्री रेडी मनुष्यबळ निर्माण करण्याच्या हेतूने या महाविद्यालयात सातत्याने नवनवे उपक्रम राबविण्यात येतात. जागतिक मानांकनप्राप्त केलेल्या बहुराष्टÑीय कंपन्यांकडून विद्यार्थ्यांना यातून प्रोत्साहन मिळते, त्यादृष्टीने आमचे महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून तयारी करून घेते, असे मत डॉ. हलकुडे यांनी व्यक्त केले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरgoogleगुगलStudentविद्यार्थी