पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच सोलापुरात; शासकीय बैठका घेणार

By बाळकृष्ण दोड्डी | Updated: October 14, 2023 15:45 IST2023-10-14T15:44:40+5:302023-10-14T15:45:27+5:30

सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने तुळजापूर रोडकडे प्रयाण करतील.

Guardian Minister Chandrakant Patil will hold government meetings throughout the day on Monday in Solapur | पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच सोलापुरात; शासकीय बैठका घेणार

पालकमंत्री झाल्यानंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच सोलापुरात; शासकीय बैठका घेणार

बाळकृष्ण दोड्डी 
सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण व वस्त्रोद्योग मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे १५ व १६ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर आहेत. रविवार, १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता शासकीय विश्रामगृह येथे त्यांचे आगमन होणार आहे. सायंकाळी ७ वाजता नागरीकांच्या भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. सोमवारी, दिवसभर शासकीय बैठका घेण्यापूर्वी सकाळी रूपाभवानी मंदिराला भेट देऊन दर्शन घेणार आहेत.

सोमवार, १६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडे आठ वाजता शासकीय विश्रामगृह येथून वाहनाने तुळजापूर रोडकडे प्रयाण करतील. सकाळी ८.५० वाजता ग्रामदैवत रूपाभवानी मंदिर येथे  रूपाभवानी देवीचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर, सकाळी सव्वा नऊ वाजता नई जिंदगी येतील श्री बसावारुढ महास्वामीजी मठास सदिच्छा भेट देणार आहेत. सकाळी अकरा वाजता नियोजन भवन येथे जिल्हा वार्षिक योजना आढावा बैठक तसेच जिल्हा परिषद यंत्रणेच्या बैठकीस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळपर्यंत विविध शासकीय विभागातील कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

Web Title: Guardian Minister Chandrakant Patil will hold government meetings throughout the day on Monday in Solapur