शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जीएसटी रद्द तरीही ‘ गणपती बाप्पा’ महागच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 12:12 IST

केंद्र सरकारच्या निर्णयाने यावर्षी गणेशभक्तांना दिलासा नाही

ठळक मुद्देकेंद्र सरकारने मूर्तीवर जीएसटी पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतलाजीएसटी लागू केल्यामुळे मूर्तिकारांनी १० ते १५ टक्के भाववाढ केली होतीगणेशोत्सव हा पारंपरिक सण

महेश कुलकर्णी 

सोलापूर : केंद्र सरकारने गणेशमूर्तीवरील जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) पूर्णपणे रद्द करण्याची घोषणा रविवारी केली. या निर्णयाचा लाभ यावर्षी तरी सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही. अनेक मूर्तिकारांनी जानेवारी ते मार्चदरम्यान गणेशमूर्ती बनविण्यासाठी लागणारे कच्चे साहित्य घेतल्याने यावर्षी किमती १० ते १५ टक्के वाढीव राहणार असल्याने यावर्षी तरी ‘बाप्पा’ महागच राहणार आहे.

केंद्र सरकारने अनेक वस्तूंवर जीएसटी लावल्याने गणेशमूर्तीच्या किमती गेल्या वर्षी वाढविण्यात आल्या होत्या. प्लॅस्टर आॅफ पॅरिस आणि रंग या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर १८ आणि २८ टक्के जीएसटी लागू केल्यामुळे मूर्तिकारांनी १० ते १५ टक्के भाववाढ केली होती. सर्वसामान्य गणेशभक्तांना घरी घेण्यासाठीची मूर्तीदेखील ५०० रुपयांपेक्षा कमी किमतीत नव्हती. गणेशोत्सव हा पारंपरिक सण असल्यामुळे केंद्र सरकारने मूर्तीवर जीएसटी पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या वर्षी केलेल्या भाववाढीमुळे अनेक मोठी मंडळे नाराज होती. यामुळे काही प्रमाणात मूर्ती मागणीवर परिणाम झाला होता. सोलापुरात ५०० च्या आसपास मूर्तीकार आहेत. एक लाखापेक्षा अधिक मूर्तींची निर्यात होते. जीएसटी लागण्याआधी प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे एक पोते १६५ रुपयांना मिळायचे, ते जीएसटीनंतर १९० रुपयांना मिळते. यावर्षीही याच भावाने मूर्तिकारांनी साहित्य खरेदी केले आहे.

प्लॅस्टर आॅफ पॅरिसवर १८ टक्के जीएसटी लागल्याने मोठ्या गणेश मंडळांचे देखावेही महाग झाले होते. गणेशोत्सव महिन्यावर आल्याने अनेक मंडळांनी देखाव्याच्या आॅडर्स दिल्या आहेत. देखावा करणाºया कलावंतांनी कच्चे साहित्यदेखील आणले आहे. यामुळे जीएसटी रद्द केली तरी यावर्षी गणेशभक्तांना दिलासा मिळणार नाही.

सध्याचा जीएसटी

  • प्लॅस्टर आॅफ पॅरिस - १८%
  • पेंट, वारनीस - २८%
  • एकूण मूर्तीकार - 300
  • कारागीर - ५00
  • सोलापुरात बनणाºया मूर्ती - १,५०,००००

 

सध्या गणपती बनवून तयार आहेत. काही मूर्ती मागणीप्रमाणे बाहेर पाठविल्या आहेत. त्यामुळे जीएसटी रद्द करण्याच्या निर्णयाने यावर्षी किमतीत काही फरक पडणार नाही. मुळातच वाढीव किमती देण्यास मंडळे विरोध करीत असल्यामुळे केंद्र सरकारने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे.- राजू गुंडला,मूर्तीकार

मूर्ती बनविण्यासाठी लागणारे काही साहित्य आम्हाला पुणे आणि मुंबईहून मागवावे लागते. फ्लोरोसेंट कलर आणि वॉर्नीश हे रंग बाहेरून मागवावे लागतात. यावर्षी सर्व साहित्य खरेदी केल्याने मूर्तीची उत्पादन किंमत गेल्यावर्षी एवढीच राहणार आहे. पुढच्या वर्षी मात्र छोट्या मूर्ती ८० ते १०० रुपयांनी कमी होतील.- मधुकर कोकुलमूर्तीकार

टॅग्स :SolapurसोलापूरGaneshotsavगणेशोत्सवGSTजीएसटी