शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उन्हाळ्याच्या कडाक्यात बागा, झाडांना सांडपाण्याचा आधार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 14:38 IST

पाणी बचतीचे धोरण; देगावच्या मलनिस्सारण केंद्रातील पाण्याचा टँकरने पुरवठा

ठळक मुद्देमहापालिकेच्या देगाव मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातील पुनर्प्रक्रिया झालेले पाणी गेल्या दोन दिवसांपासून टॅँकरद्वारे शहरातील उद्याने, रस्ता दुभाजकातील झाडे यांना दिले जात आहेगेल्या तीन महिन्यांपासून शहरात पाणीटंचाई आहे. निवडणुकीच्या काळात शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा झाला

सोलापूर : उन्हाच्या कडाक्यात नागरिकांना चार ते पाच दिवसाआड पाणी मिळते तिथे उद्याने, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता यासाठी पाणी कुठून द्यायचे, असा प्रश्न महापालिकेसमोर होता. हा प्रश्न मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी निकाली काढला आहे. महापालिकेच्या देगाव मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रातील पुनर्प्रक्रिया झालेले पाणी गेल्या दोन दिवसांपासून टॅँकरद्वारे शहरातील उद्याने, रस्ता दुभाजकातील झाडे यांना दिले जात आहे. 

गेल्या तीन महिन्यांपासून शहरात पाणीटंचाई आहे. निवडणुकीच्या काळात शहरात पाच ते सहा दिवसाआड पाणीपुरवठा झाला. पाणीटंचाईमुळे उद्याने, दुभाजकातील झाडांना पाणी देण्यात अडचणी येत होत्या. महापालिकेचे देगाव येथे ७५ एमएलडी क्षमतेचे मलनिस्सारण केंद्र आहे. प्रक्रियेनंतर शुध्द झालेले पाणी नाल्यात सोडले जाते. देगाव परिसरातील शेतकरी या पाण्यावर शेती पिकवितात. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांनी नुकतेच या मलनिस्सारण केंद्राची पाहणी केली. शुध्द झालेल्या पाण्याचा पुनर्वापर व्हायला हवा. हे पाणी थेट नाल्यात सोडण्याऐवजी टॅँकरद्वारे उद्याने, दुभाजकातील झाडे, रस्त्याची कामे, सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता अशा कामांसाठी देण्यात यावे, अशी सूचना केली. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य अभियंता कार्यालयातील अधिकाºयांनी देगाव मलनिस्सारण केंद्रावर टॅँकर भरण्यासाठी पंप बसवून घेतले. गेल्या दोन दिवसांपासून टॅँकरद्वारे शहरातील बागा, हरित क्षेत्र, दुभाजकांना पाणी दिले जात आहे.

इस्रायलसारख्या देशात कमी पाऊस असताना मोठ्या प्रमाणावर शेती होते. आपल्याकडे पाण्याचा पुनर्वापर करण्याची सवय लागायला हवी. मलनिस्सारण केंद्रातील प्रक्रिया झालेल्या पाण्याचा पुनर्वापर झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची बचत होईल. पुनर्प्रक्रिया झालेल्या पाण्याला कोणत्याही प्रकारचा वास अथवा त्यात कोणत्याही प्रकारचे हानिकारक घटक नाहीत. बांधकामासाठी हे पाणी वापरता येऊ शकते. महापालिका त्यादृष्टीने धोरणही आखणार आहे. - दीपक तावरेआयुक्त, मनपा 

टॅग्स :SolapurसोलापूरenvironmentवातावरणWaterपाणीwater transportजलवाहतूक