पानगाव, कुसळंब येथे मामासाहेब जगदाळे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:39 IST2021-02-06T04:39:24+5:302021-02-06T04:39:24+5:30

गेल्या सप्ताहात आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच सुधीर काळे, शाळेचे उपाध्यक्ष ...

Greetings to Mamasaheb Jagdale at Pangaon, Kusalamba | पानगाव, कुसळंब येथे मामासाहेब जगदाळे यांना अभिवादन

पानगाव, कुसळंब येथे मामासाहेब जगदाळे यांना अभिवादन

गेल्या सप्ताहात आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सरपंच सुधीर काळे, शाळेचे उपाध्यक्ष संतोष पाटील, तंटामुक्त अध्यक्ष जगन्नाथ कापसे, संतोष कानगुडे, नरहरी काळे, दामोदर पवार, गोपीनाथ कानगुडे, राजेंद्र चव्हाण, नंदकुमार काळे, अजित पाटील, विजया मोरे, अरुण जमदाडे यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते. प्रास्ताविक प्रमोद जाधव यांनी केले. सूत्रसंचालन अमोल महाले यांनी केले, तर आभार प्रशांत बारंगुळे यांनी मानले. तसेच येथील कर्मवीर ग्रंथालयात अगदी साधेपणाने जगदाळे मामा यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेचे पूजन सुहास सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्याम जानराव, इस्माईल मोमीन, कमलाकर घळके, आनंद मस्के, किरण घळके, प्रणव पाटील, आर्यन पोकळे उपस्थित होते. सूत्रसंचालन ग्रंथपाल विनोद गायकवाड यांनी केले, तर आभार हनुमंत तुपे यांनी मानले.

फोटो

०४पानगाव०१

ओळी

पानगाव येथील संत तुकाराम विद्यालयातील विविध स्पर्धेतील विजेत्यांच्या सत्काराप्रसंगी प्रदीप पाटील, सुधीर काळे, संतोष पाटील, जगन्नाथ कापसे आदी.

Web Title: Greetings to Mamasaheb Jagdale at Pangaon, Kusalamba