शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
3
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
4
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
5
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
6
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
7
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
8
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
9
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
10
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
11
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
12
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
13
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
14
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
15
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
17
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
18
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
19
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
20
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना

डिसले गुरुजींच्या परदेशवारीला हिरवा कंदील, शिक्षणमंत्र्यांचे सीईओंना निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 13:29 IST

सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक @ranjitdisale जी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे

मुंबई - ‘शाळेसाठी तुम्ही काय केले, ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना सवाल’ या मथळ्याखाली शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये ठळकपणे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर ग्लोबल टिचर पुरस्कारप्राप्त डिसले गुरुजींचा विषय राज्यभरात चर्चेचा झाला. अमेरिकेत पीएचडी मिळविण्यासाठी गुरूवारी डिसले गुरूजी जिल्हा परिषदेत आले होते. रजेसाठी अर्ज समोर ठेवल्यानंतर शिक्षणाधिकारी लोहार यांनी त्यांना शाळेसाठी काय केले असा सवाल केला. पीएचडीसाठी विहित नमुन्यात मुख्याध्यापकांकडे अर्ज सादर करा असे सांगून परत पाठविले होते. त्यानंतर, आता शिक्षणमंत्रीवर्षा गायकवाड यांनी याबाबत सोलापूरच्या सीईओंना निर्देश दिले आहेत. 

हे वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा झाला. काही जणांनी या प्रकाराचा निषेध केला तर काही जणांनी यामागे नेमके कारण आहे तरी काय असे प्रश्न उपस्थित केले होते. आता, याप्रकरणी स्वत: शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लक्ष घातले आहे. तसेच, वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन डिसले गुरुजींच्या विदेशावारी शिष्यवृत्तीसाठीच्या रजेचा अर्ज मंजूर करण्याचेही त्यांनी निर्देश दिले आहेत.  सोलापूरच्या परितेवाडी जी.प. शाळेतील शिक्षक @ranjitdisale जी यांनी उच्च शिक्षणासंदर्भात दिलेल्या अर्जाबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.दिलीप स्वामी यांच्याशी चर्चा करून हा अर्ज मंजूर करण्यास सांगितले आहे, असे ट्विट वर्षा गायकवाड यांनी केले आहे.  

काय म्हणाले होते शिक्षणाधिकारी

शिक्षणाधिकारी लोहार यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ग्लोबल टीचर डिसले गुरूजी यांच्या पुरस्काराबाबत लेखी तक्रार आली होती. या तक्रारीवरून कुर्डुुवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारूती फडके यांच्यासह विस्तार अधिकारी उमा साळुंके, सुभाष दाढे, मुख्याध्यापक रामेश्वर लोंढे, विस्तार अधिकारी बंडू शिंदे या पाच जणांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने २५ मार्च २०२१ रोजी अहवाल सादर केला. यात समितीने सहा मुद्यांवर चौकशी केली. 

ग्लोबल पुरस्कार मिळाल्याचे जाहीर केल्यावर जिल्ह्यातील इतर शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांना जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे प्रतिनियुक्ती देण्यात आली. त्यानंतर त्यांना मुदतवाढ दिली. पण या काळात ते या संस्थेकडेही हजर नव्हते, असे या संस्थेने कळविले आहे. त्यानंतर परितेवाडी शाळेत रुजू झाल्यानंतर तीन वर्षे ते कामावर हजर झालेच नाहीत, असे चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे.

डिसले गुरूजींनी पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्यासाठी कार्यालयाची परवानगी घेतली नाही. पुरस्काराबाबत ज्या संस्थेशी पत्रव्यवहार झाला, ईमेल, पुरस्कार मिळाल्यानंतरचे छायाचित्र, व्हिडीओ क्लिप सादर करण्यास नकार दिला. क्युआर कोड पुस्तकांचा प्रकल्प टोराॅन्टो (कॅनडा) येथे सादर करण्यास दहा दिवसाची रजा मंजूर केली होती. या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही रजा मंजूर नाही, असे चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे.

मला पैसे मागितले, नोकरी सोडणार

मी दिलेला रजेचा अर्ज गेल्या दीड महिन्यांपासून प्रलंतिब ठेवण्यात आला. यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून मला त्रास देण्यात आला. पैशाची मागणीही करण्यात आल्याचा आरोप डिसले गुरुजींनी केला आहे. रजा न मिळाल्याने माझ्या हातून फुलब्राइट स्कॉलरशीप जाण्याची भीती आहे. शिक्षण विभागाकडून देण्यात येणारा हा त्रास पाहून गुरुजीची नोकरी सोडण्याची आता माझी मानसिकता बनली आहे, असेही डिसले गुरुजींनी लोकमतशी बोलताना म्हटले. 

चौकशी समितीचे आरोपरही डिसले गुरुजींनी फेटाळले आहेत. याबाबत दोन पानी दिलेल्या पत्रात त्यांनी, ग्लोबल पुरस्काराने कामाची व्याप्ती वाढली, केवळ जिल्हा नव्हे तर राज्यभर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पार पाडली, असे गुरुजींनी नमूद केले आहे.   

टॅग्स :Ranjitsinh Disaleरणजितसिंह डिसलेSolapurसोलापूरVarsha Gaikwadवर्षा गायकवाडEducationशिक्षण