शहरं
Join us  
Trending Stories
1
तो व्हिडीओ माझ्या 'बाळा'चा नाही, व्हायरल होणाऱ्या रॅप व्हिडीओबाबत आरोपीच्या आईची प्रतिक्रिया
2
"गाडी चढी आप पे, पैसे मेरे बाप पे..."; पुणे अपघातातील आरोपीचा कथित व्हिडिओ व्हायरल, नेटकरी खवळले
3
मतदानाच्या फॉर्म १७सी वरून वाद, आकडेवारीत फेरफाराचा आरोप, प्रसिद्ध न करण्यामागे ECI ने दिलं असं कारण
4
ताशी २ हजार किमी वेग, भयंकर मारक क्षमता, अमेरिकेने दाखवली जगातील सर्वात घातक विमानाची पहिली झलक
5
डोंबिवली एमआयडीसी स्फोट: मृतांचा आकडा वाढला; ६ जणांनी गमावले प्राण, ४८ जखमींवर उपचार सुरू
6
"...तर मी पाकिस्तानच्या हजारो सैनिकांना सोडलं नसतं," मोदींचा पंजाबमधून काँग्रेसवर हल्लाबोल
7
गजानन कीर्तीकर यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिले असे संकेत  
8
"पतीच्या डोळ्यातून रक्त अन्...", दहशतवाद्यांच्या हल्ल्याला सामोरी गेलेल्या महिलेची थरारक कहाणी!
9
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 7 नक्षलवाद्यांना घातले कंठस्नान
10
संशयातून हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; खिशातून पैसे चोरण्याच्या आरोपात पतीने केली पत्नीची हत्या
11
ॲमेझॉनच्या कर्मचाऱ्याचा कारनामा, कंपनी सोडणाऱ्यांच्या खात्यांमधून काढले कोट्यवधी रुपये, अखेर असा सापडला जाळ्यात
12
"पुण्यातील कार अपघाताची न्यायालयीन चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्या’’ काँग्रेसची मागणी   
13
"स्वत:च्या मर्यादा पाळा, घुसखोरी करायचा प्रयत्न केलात तर..."; तैवानने चीनला भरला सज्जड दम
14
स्फोटामुळं डोंबिवली हादरली! इमारतीच्या काचा फुटल्या, ३ किमी परिसर दहशतीत
15
"डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार"
16
शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचं ट्वीट, किंग खानच्या तब्येतीविषयी दिली महत्वाची अपडेट
17
रोहित पवारांचे नीरव मोदी कनेक्शन?; कर्जत MIDC प्रकरणावरून अजित पवार गटाचा गंभीर आरोप
18
"विभवने कुणाच्या सांगण्यावरून मारहाण केली?’’, संपूर्ण घटनाक्रम सांगत स्वाती मालिवाल यांचा सवाल   
19
IPL 2024 चे दोन सामने उरले! दिग्गज ब्रेट लीने जाहीर केले फायनलिस्ट अन् 'चॅम्पियन'
20
बिल्डरचा मुलगा, राष्ट्रवादी नेत्याचा पोरगा! अखेर जळगावच्या 'हिट अँड रन' प्रकरणात पोलिसांची कारवाई

सोलापुरातील नाना-नानी पार्कमधील हिरवळ हद्दपार; चिमुकल्यांच्या खेळण्यांची दुरवस्था, दारूच्या बाटल्यांचीही चलती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 3:10 PM

अवकळा...उद्यानांची ! माणसांसाठीच्या बागेत शेळ्या-रेड्यांचा मुक्त वावर; महापालिकेला नाही सवड यांना घालण्यासाठी आवर

ठळक मुद्देशहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाना-नानी पार्क उद्यानाच्या विशाल प्रांगणामध्ये उंच मोठमोठी झाडे आणि त्यांची गर्द सावली शहरामध्ये आहेत त्या उद्यानांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नसल्याचं गाºहाणं लोकांमधून मांडलं जात आहे.

विलास जळकोटकरसोलापूर: शहराचा गजबजलेला परिसर.. सात रस्ता चौकापासून चार-पाच मिनिटे अन् रंगभवन चौकापासून पाच-सात मिनिटांत अंतर कापणारा परिसर म्हणजे नाना-नानी पार्क उद्यान. रोडला लागूनच असलेलं हे उद्यान सायंकाळच्या वेळी प्रामुख्यानं नातवंडांसमवेत येणाºया आजी-आजोबांसाठीचं हक्काचं अन् विरंगुळ्याचं स्थान संबोधलं जातं. म्हणूनच की काय या उद्यानाला नाना-नानी पार्क नावानं ओळखलं जातं. पण सध्या माणसांसाठी असलेल्या या उद्यानामध्ये शेळ्या-रेड्यांचा मुक्त वावर दिसू लागला आहे. शिवाय चिमुकल्यांसाठीच्या खेळण्यांचीही दुरवस्था दिसून येत आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाला याकडे लक्ष देण्यास सवड नसल्याच्या भावना लोकांमध्ये उमटू लागल्या आहेत.

एकीकडे स्मार्ट सिटीच्या उपक्रमांतर्गत शहर सुंदर होण्यासाठी महापालिकेच्या वतीने वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जात असताना शहरामध्ये आहेत त्या उद्यानांची स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नसल्याचं गाºहाणं लोकांमधून मांडलं जात आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने मुख्यत्वे शहरात महापालिकेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या उद्यानांकडं लक्ष पुरवले जावे, अशी भावनाही अनेकांनी व्यक्त केली.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नाना-नानी पार्क उद्यानाच्या विशाल प्रांगणामध्ये उंच मोठमोठी झाडे आणि त्यांची गर्द सावली यामुळे आजूबाजूच्या परिसरातील वयस्क मंडळी सायंकाळच्या वेळी विरंगुळा म्हणून येतात. सोबत लहान मुलंंही असतात. त्यांच्यासाठी जी खेळणी या उद्यानात बसवण्यात आली आहेत, त्यांची दुरवस्था झाली आहे. मोठी झाडे वगळता पाण्यामुळे हिरवळ नाहीशी झाली आहे. जिकडं तिकडं वाळून पांढरं झालेलं गवत दिसू लागलं आहे. महापालिकेकडील स्वतंत्र असलेल्या उद्यान विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी सुजित कुलकर्णी, आशा गायकवाड, संजय विभूते, कीर्ती जोडमुटे, दिगंबर पारवे या मंडळींनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. 

या उद्यानाला चहूबाजूने कुंपण असूनही आबालवृद्धांसाठी असलेल्या उद्यानामध्ये कड्या-कोपºयाला असलेली हिरवळ, गवत चारण्यासाठी शेळ्या, रेड्यांची झुंड प्रवेशद्वाराच्या छोट्या गेटमधून नेली जाते. यासाठी त्यांना मज्जाव करणारेही कोणी दिसून येत नाही. एकीकडे चरणाºया या शेळ्या आणि दुसरीकडे दुपारी, रात्री अवैध कृत्येही येथे होत असल्याचे दिसते. बागेतल्या विविध कोपºयांच्या ठिकाणी मद्याच्या रिकाम्या बाटल्या दिसून आल्या. कोणीही या कुणी अडवणार नाही, विचारणार नाही अशी या उद्यानाची स्थिती झाली असल्याच्या प्रतिक्रियाही काहींनी नावे न सांगण्याच्या अटीवर प्रस्तुत प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. 

गेल्या अनेक वर्षांपासून जोपासलेली मोठी झाडे या उद्यानाच्या सौंदर्यात भर टाकणारी आहेत. मात्र इथं कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे आहे त्या चांगल्या उद्यानाची अवस्था भयाण झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये रोटरी क्लबने ही बाग विकसित करून चांगले स्वरूप निर्माण केले होते. उद्यान विभागाने शहरातील सामाजिक संस्थांच्या साहाय्याने त्यांना प्रोत्साहित करून अशा बागांचा विकास करावा. गैरप्रकार टाळले जावेत, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे.

अन् शेळ्या-रेड्या काढल्या बाहेर- उद्यानाच्या स्थितीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या लोकमत चमूकडून कॅमेºयातून छायाचित्र टिपताना ज्यांनी उद्यानात शेळ्या आणल्या त्या मंडळींनी तातडीने शेळ्या-रेड्यांना हाकलून नेण्याचा प्रकारही दिसून आला. बागेत येणाºया-जाणाºया कोणांवरही इथे नियंत्रण नसल्याचे दिसून आले. दुपारच्या वेळी मुख्य प्रवेशद्वार बंद असते. तरीही किमान एका व्यक्तीला जाता येईल, अशा छोट्या गेटमधून बिनधास्तपणे शेळ्यांना आत नेले जाते आणि जेव्हा वाटेल तेव्हा परत नेले जाते. हे चित्र नित्याचे असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. 

स्मार्ट सिटी-स्मार्ट उद्यान हवे- शहर स्मार्ट होत असताना उद्यानेही स्मार्ट व्हावीत, यासाठी उद्यान विभागाने विशेष लक्ष द्यावे. शहरातल्या सर्व बागांची पाहणी करण्याचे आदेश आयुक्तांनी उद्यान विभागाला द्यावेत. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शहरातील विविध सामाजिक संस्था प्रयत्नशील आहेत. त्यांनाही यामध्ये सहभागी करून घेण्यात यावे. निश्चितच सकारात्मक प्रतिसाद मिळू शकेल, अशी अपेक्षा निसर्गप्रेमी, पर्यावरणवरती काम करणाºया अरविंद म्हेत्रे, मुकुंद शेटे, मनोज देवकर, पप्पू जमादार आदींनी व्यक्त केली.

दुपारी वामकुक्षीचं ठिकाण४दुपारच्या वेळी झाडाखाली वामकुक्षी घेणं एवढंच याचं स्थान राहिल्याचं दिसून येत आहे. बच्चे कंपनींसाठी इथे निर्माण केलेल्या खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. त्याच्या डागडुजीकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. काही मंडळी उद्यानाचा कोपरा शोधून मद्यपान करीत एन्जॉय करीत असल्याचेही दिसून आले. 

टॅग्स :Solapurसोलापूर