शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

शिष्यवृत्ती, गंभीर आजारांसाठी सोलापूरसाठी सतरा लाखांचे अर्थसहाय्य मंजूर

By appasaheb.patil | Updated: March 23, 2019 12:49 IST

ललित कला भवन, रविवार पेठ,सोलापूर कामगार कल्याण मंडळ : लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा

ठळक मुद्देशिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तके सहाय्य, गंभीर आजार, संगणक प्रशिक्षण आदी योजनेंतर्गत असलेल्या ५२३ लाभार्थ्यांना १७ लाखांचे सहाय्य मंजूर  मंजूर निधी प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक आनंद धडके, कल्याण निरीक्षक तिपण्णा करजगी यांनी दिली

सोलापूर : शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तके सहाय्य, गंभीर आजार, संगणक प्रशिक्षण आदी योजनेंतर्गत असलेल्या ५२३ लाभार्थ्यांना १७ लाखांचे सहाय्य मंजूर झाले आहे. मंजूर निधी प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यावर जमा करण्यात आल्याची माहिती कामगार कल्याण मंडळाचे केंद्र संचालक आनंद धडके, कल्याण निरीक्षक तिपण्णा करजगी यांनी दिली.

मुंबई कामगार कल्याण निधी अधिनियम १९४३ अंतर्गत मंडळाकडे कामगार कल्याण निधी भरणाºया कामगार, कामगार कुटुंबीय, विद्यार्थ्यांना गट कार्यालय, सोलापूर अंतर्गत येणाºया ललित कला भवन, रविवार पेठ येथे सन २०१८-२०१९ या वर्षासाठी योजना होती़ या योजनेत दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, माळीनगर, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, चंद्रभागानगर, भाळवणी, जीआरपी, एसटी महामंडळ, एलआयसी आदी आस्थापनेवरील कामगार व कामगार कुटुंबीयांनी शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तके सहाय्य, गंभीर आजारासाठी अर्थसहाय्य करणे यासाठी ५२३ लाभार्थ्यांनी कामगार कल्याण मंडळाकडे अर्ज केला होता़ त्यानुसार कल्याण मंडळाने शासनाकडे पाठपुरावा करून आवश्यक निधी शासनाकडून मंजूर करून घेतला़ शासनाने कल्याण मंडळाकडे १७ लाखांचा निधी वर्ग केला आहे़ त्यानुसार मंडळाने संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा केल्याची माहिती केंद्र संचालक तिपण्णा करजगी यांनी दिली़ 

आमच्या कार्यालयाकडून दरवर्षी कामगार व कामगार कुटुंबीयांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. याशिवाय गंभीर आजार, शैक्षणिक साहित्य आदींसाठी अर्थसहाय्य करण्यात येते़ २०१८-२०१९ या वर्षासाठी ५२३ लाभार्थ्यांनी अर्ज केला होता़ या लाभार्थ्यांसाठी शासनाने १७ लाखांचा निधी मंजूर केला आहे़ तो निधी संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला आहे़ - आनंद धडके,केंद्र संचालक, ललित कला भवन,

टॅग्स :Solapurसोलापूरgovernment schemeसरकारी योजनाHealthआरोग्यEducationशिक्षण