कारच्या धडकेत आजोबा अन् नातीनं गमावला प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:26 IST2021-08-12T04:26:53+5:302021-08-12T04:26:53+5:30
यात हकीकत अशी, की झरे येथील कीर्तनकार ह. भ. प. हरिश्चंद्र सोपान गायकवाड (६३) हे आपल्या लुनावरून नात संजीवनी ...

कारच्या धडकेत आजोबा अन् नातीनं गमावला प्राण
यात हकीकत अशी, की झरे येथील कीर्तनकार ह. भ. प. हरिश्चंद्र सोपान गायकवाड (६३) हे आपल्या लुनावरून नात संजीवनी शंकर मिटे (१२) हिला घेऊन जावयाच्या हॉटेलचे बांधकाम पाहण्यासाठी झरे गावाहून जात होते. झरे फाट्यापासून पुढे गेल्यानंतर शंकर मिटे यांच्या हॉटेलकडे वळत असताना पाठीमागून आलेल्या कारने (एम.एच.४५, एएल ४१४०) जोराची धडक दिली. त्यावेळी हे दोघेही लुनावरून रस्त्यावर पडले. गंभीर दुखापत झाल्याने संजीवनी मिटे ही जागीच ठार झाली तर हरिश्चंद्र गायकवाड यांना करमाळा येथे दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांचेही निधन झाले.
या प्रकरणी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ती कार करमाळा शहरातील असून, पोलीसांनी ती जप्त केली आहे.
----