शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ठिबक अनुदानासाठी शासनाने १८ कोटी दिले शेतकºयांनी केवळ ७४ लाख मागितले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 13:14 IST

सोलापूर : ठिबक केलेल्यांना अनुदान मिळत नसल्याच्या आजवरच्या तक्रारी सर्वज्ञात आहेत. मात्र यावर्षी उलटेच झाले आहे. कृषी खात्याच्या ३६ ...

ठळक मुद्दे३६ कोटींचा आराखडा मात्र अनुदानासाठी प्रस्ताव मात्र येईनातठिबक अनुदानासाठी जिल्ह्यातील ७ हजार १३६ शेतकºयांचे आॅनलाईन प्रस्ताव दाखल ६ हजार २७४ शेतकºयांना ठिबक करण्यासाठी कृषी खात्याने मंजुरी दिली

सोलापूर : ठिबक केलेल्यांना अनुदान मिळत नसल्याच्या आजवरच्या तक्रारी सर्वज्ञात आहेत. मात्र यावर्षी उलटेच झाले आहे. कृषी खात्याच्या ३६ कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली व १७ कोटी ६५ लाख रुपयेही आले असले तरी अनुदानासाठी अवघे ७४ लाख रुपयांचेच प्रस्ताव आले आहेत.

शासन पाणी वाचवा असा प्रचार करते. एकीकडे शासन शेतीपिके ठिबकवरच करण्यास सांगते, मात्र त्यासाठी पुरेशी रक्कम दिली जात नाही, अशा अनेक वर्षांपासूनच्या तक्रारी आहेत. सरकार दरबारी ही परिस्थिती बदलेल की नाही?, असे वाटते मात्र परिस्थिती बदललेली आहे. २०१८-१९ या वर्षासाठी ठिबकसाठी ३६ कोटी रुपये खर्च होईल, असे गृहीत धरुन आराखडा तयार केला आहे. या आराखड्याला मंजुरीही मिळाली आहे. या आराखड्यापैकी केंद्र शासनाकडून ५ कोटी व राज्य शासनाकडून १२ कोटी ६५ लाख रुपये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला मिळाले आहेत. 

हे १७ कोटी ६५ लाख रुपय खर्च केला तर उर्वरित रक्कमही शासनाकडून मिळणार आहे. मात्र ही रक्कम खर्च होत नाही. आलेल्या प्रस्तावांपैकी तपासणी करुन पात्र असलेल्या ४२१ प्रस्तावांनुसार अनुदान वर्ग करण्यासाठी कोषागार कार्यालयाकडे प्रस्ताव दिले आहेत. या ४२१ प्रस्तावांसाठी ७४ लाख रुपये खर्च होणार आहेत. 

फेब्रुवारी व मार्च या दोन महिन्यात फारशी रक्कम खर्च होईल, असेही सांगता येत नसल्याचे कृषी कार्यालयातून सांगण्यात आले. यामुळे आलेली रक्कमच खर्च होण्याची शक्यता नसल्याने आराखड्यातील उर्वरित रक्कम मिळणार नाही.

अशी आहे सद्यस्थिती..

  • - ठिबक अनुदानासाठी जिल्ह्यातील ७ हजार १३६ शेतकºयांचे आॅनलाईन प्रस्ताव दाखल झाले.
  • - तपासणीत विविध कारणांमुळे ३१२ प्रस्ताव अनुदानासाठी अपात्र ठरले.
  • - अनुदानासाठी ६ हजार ८२२ प्रस्ताव पात्र ठरले.
  • - ६ हजार २७४ शेतकºयांना ठिबक करण्यासाठी कृषी खात्याने मंजुरी दिली.
  • - ठिबक संच बसवून २१२९ शेतकºयांनी अनुदानासाठी प्रस्ताव दाखल केले.
  • - त्यापैकी प्रत्यक्षात १२५८ संचाची तपासणी करून ४२१ प्रस्तावांचे अनुदान शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 दुष्काळाचा मोठा फटका ठिबक योजनेला बसला आहे. पाणी नसल्याने शेतकरी ठिबक करण्यास धजत नाहीत. जिल्ह्यात दरवर्षी ठिबकसाठी लागणारी रक्कम लक्षात घेऊन शासनाने अगोदरच पैसे उपलब्ध केले आहेत. -बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रgovernment schemeसरकारी योजनाdroughtदुष्काळ